कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण डाळ निवडून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी मग मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यावे किंवा चक्की मधून दळून आणावी मग लाल तिखट, मीठ, लसूण पाकळ्या, सुकं खोबरं, जीरे,हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यावे मग एक वाटी मध्ये पीठ घेऊन त्यात हे बनवलेली चटणी व हळद घालून हाताने मिक्स करून घ्यावे मग त्यात थोडे थोडे पाणी घालून माळून घ्यावे माळून झाल्यावर थोड्या वेळ झाकण ठेवून घ्यावे.
- 2
मग हाताला तेल लावून ताटामध्ये सांडगे तयार करून घ्यावे मग दोन ते तीन दिवस उन्हात वाळवून घ्यावेत म्हणजे वर्षभर छान टिकतात...
- 3
टीप.... लाल तिखट कमी वापरावे कारण की आपण सांडग्याची भाजी बनवणार तर त्यात पण तिखट वापर तर मग खूप तिखट होती....👌👍🌱🌿🌳
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रस्सा सांडगे (rassa sandge recipe in marathi)
Sonal Isal Kolhe यांची रस्सा सांडगे हि रेसिपी (माझे बरेच ट्विस्ट वापरून) मी #Cooksnap केलेली आहे. :) सुप्रिया घुडे -
सांडगे (Sandge Recipe In Marathi)
सांडगे उन्हाळ्यात केले जातात. पावसाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, जास्तीच्या पावसामुळे बऱ्याच वेळेस भाजी जाऊन खरेदी कारण्यासच अडचण निर्माण होते. गावाकडे तर पावसात चार-चार दिवस बाहेर पडायची मुश्किल होते. अश्या वेळी सांडग्याची भाजी करता येते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
गाजराचे सांडगे (Gajarache sandge recipe in marathi)
#गाजर #वाळवण #गाजर_सांडगे ....हा एक वाळवणिचा म्हणजे उन्हात वाळवून साठवणिचा प्रकार आहे....खिचडी सोबत पापड ,सांडगे हे कॉम्बिनेशन सगळ्यांनाच फार आवडत... सांडगे खूप वेगवेगळ्या प्रकारे करतात पण माझ्याकडे फक्त गाजर आणि टमाटर मीक्स सांडगे सगळ्यांना खूप आवडतात..... म्हणून मी हे केलेत....हिवाळ्यामध्ये मिळणारे लालचुटूक गाजर आणून त्याचे मी असे सांडगे करून ठेवत असते आणि स्टोअर करून ठेवते जेवायच्या वेळेस खिचडी पिठलं वगैरे जेव्हा असतं तेव्हा हे पटकन तोंडीलावणे तेलात तळून खाता येतात.... Varsha Deshpande -
गाजराचे सांडगे (Gajrache sandge recipe in marathi)
#winterspecialजसे उन्हाळी वाळवणं करतात तसेच काही वाळवणं हिवाळ्यातही करतात.कारण हिवाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात,मग याचाच फायदा घेउन छान मस्त मस्त पदार्थ तर झालेच पाहीजे.....गाजराचे सांडगे आमच्या विदर्भात खुपच फेमस आहेत.हिवाळ्यात घरोघरी हे सांडगे करतात,वाळवुन छान जेवतांना तोंडी लावण्यासाठी खातात,खिचडीसोबतही खूप छान लागतात...तर पाहुया याची रेसिपी....,, Supriya Thengadi -
गव्हाचे सांडगे (gavache sandge recipe in marathi)
#पारंपारीकरेसिपीकोंड्याचा मांडा करणे म्हणजे काय ते या रेसिपी मधुन कळते. खरच पूर्वी लोक काहीही वाया घालवत नसत.अगदी भाजीच्या देठांची,सालांची चटणी,उरलेल्या कुठल्याही पदार्थापासुन नविन पदार्थ करणे या मधे तर घरातील स्त्रीयांचा हातखंडा च असे.आणि हे अदार्थ तितक्याच चविने घरातले खात असत.अशीच ही एक गव्हाच्या सांडग्यांची रेसिपी..... जेव्हा कुरडया करतो तेव्हा चिक काढुन उरलेला चोथा बहुतेक लोक तो फेकुन देतात किंवा आंबोण म्हणून गायीला खायला देतात.पण या गव्हाच्या चोथ्याला फेकुन न देता माझी आई दरवर्षी याचे सांडगे करते.कारण हा चोथा खुप पौष्टीक असतो. हे सांडगे खुप छान खुसखुशित होतात.आपण तसेही खिचडीसोबत तळुन खाउ शकतो किंवा याची भाजी ही करु शकतो.तर मग पाहुया याची रेसिपी....... Supriya Thengadi -
-
-
सांडग्यांची रस्सा भाजी (sandgyachi rassa bhaji recipe in marathi)
"सांडग्यांची रस्सा भाजी"आज मी इन्स्टंट सांडगे बनवुन रस्सा भाजी बनवली आहे.. इन्स्टंट सांडगे ची रेसिपी आधीच पोस्ट केलेली आहे आता रस्सा भाजी.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
-
भाताचे सांडगे
#goldenapron3#lockdownओळखलेले कीवर्ड :leftover, riceया रेसिपी साठी मी उरलेला भात वापरला आहे, त्या पासून मी झटपट, कुडूम कुडूम सांडगे बनवले, अतिशय चवदार अशी ही रेसिपी आहे. Varsha Pandit -
-
-
-
सांडगेची भाजी (sandgechi bhaji recipe in marathi)
उन्हाळ्यात सांडगे बनवले की मग पाऊसळात मस्त भाजून खाता येतात . Rajashree Yele -
हळदीच्या पानातील पापलेट (oil free) (haldichya panantil paplet recipe in marathi)
#पापलेट# आज मी पापलेट बनवली आहे केळीच्या पानातली सर्वन माहिती आहे पण आज मी हळदीच्या पानातील पापलेट बनवली आहे ..... Rajashree Yele -
इन्स्टंट कुरकुरीत सांडगे (instant kurkurit sandge recipe in marathi)
उन्हाळ्यात काही कारणाने सांडगे बनवता आले नाही, किंवा शहरात राहणाऱ्यांना सुकायला कुठे घालावे असा अनेकांना प्रश्न असतो.. .. किंवा बनवलेले संपले असतील तर.. पावसाळ्यात घरात भाजी नसेल तर..या सगळ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.. मस्त कुरकुरीत सांडगे तयार होतात....याचा रस्सा बनवा किंवा असेच खायला ही छान कुरकुरीत लागतात... नक्की ट्राय करा.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
शिंपले (तिसऱ्या) ग्रेव्ही (shimple recipe in marathi)
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या.# mfrमाझी आवडती रेसिपी Minal Gole -
उडदाचं घुटं... पश्चिम महाराष्ट्र स्पेशल (uddacha ghunt recipe in marathi)
#KS2 #पश्चिम महाराष्ट्र स्पेशल #उडदाचं घुटं उडदाचं घुटं ... पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यांत थोड्या फार फरकाने केला जाणारा हा पारंपरिक आणि चमचमीत आमटीचा प्रकार...पण मुळात उडदाचं घुटं म्हटलं की सातारचं असं काहीजण मानतात..आणि मग ते सर्वदूर पसरले.. आपल्याला काय करायचंय.. चमचमीत पदार्थ खाण्याशी मतलब..पदार्थांना देश ,राज्यांसारख्या सीमारेषा नाहीत हे एक बरंय.. त्यामुळेच आपल्या सारख्या खवैय्यांची चंगळ होते..😀 पश्चिम महाराष्ट्र रेसिपी बघताना मला एक जाणवलंय की या भागात आमट्यांचे विविध प्रकार आहेत..आणि त्या विविध प्रकारे केल्या जातात..बरं आणि नांव पण खूप मजेशीर आहेत..हेच बघा ना..घुटं,झिरकं,बाजार आमटी,खळगुटं,तसंच डाळ मेथी,डाळ पालक,डाळ कांदा..असे एक ना अनेक शाकाहारी पदार्थ मांसाहाराबरोबर दिमाखात मिरवत आहेत..हम भी कुछ कम नहीं या आविर्भावात..😀 किती वैविध्यपूर्ण आहे आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती हे या थीमच्या निमित्ताने बघायला मिळतंय. त्याचबरोबर त्या त्या प्रदेशाची virtual सैर होतीये..पुन्हा इतिहास भूगोल नव्याने शिकायला मिळतोय..आणि त्याच्याशी जोडलेली खाद्यसंस्कृती, ग्राम्य संस्कृती,शहरीकरणामुळे होत असलेले बदल कळून येतात.. आणि ज्ञानात भर पडत आहे..सगळ्या मैत्रिणींना कडून सगळ्या प्रदेशातील वेगवेगळ्या रेसिपी वाचायला मिळतात..तर काही रेसिपीज नव्याने कळत आहेत.. खूप छान असा हा प्रवास..😊👌 चला तर मग याच प्रवासातील एक महत्वाची पारंपरिक रेसिपी करु या.. Bhagyashree Lele -
ज्वारीचे कुरकुरीत खारवडया/सांडगे (Jowariche Sandge Recipe In Marathi)
विदर्भातील प्रसिद्ध ची रेसिपी आहे की उन्हाळ्यात तयार केली जाते Priyanka yesekar -
-
कडीपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4फोडणीत जिरं आणि मोहरीसोबत कढीपत्ता टाकला की, असा मस्त खमंग सुवास सुटतो की, लगेचच भूक चाळवते. डाळ, आमटी, कढी यामध्ये कढीपत्ता आवर्जून घातला जातो. पण जेवणाला चव आणण्याव्यतिरिक्तही कढीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमि E असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. विविध स्तरावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कढीपत्ता हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच पण कढीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस आणि त्वचाही चांगली होते. चला तर मग बघुयात अश्या ह्या बहुगुणकारी कडीपत्त्याची चटणी. Pritam KadamRane -
-
मिश्र पंचडाळ वडे (mix panch dal vade recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन_चॅलेंज "मिश्र पंचडाळ वडे"आमच्या कडे मसूर डाळ वापरली जात नाही, खाल्ली जात नाही..या निमित्ताने मसूर डाळ घरातील सगळ्यांच्या पोटात गेली .. सर्व डाळींचा आणि मिरची कोथिंबीर कांदा या सगळ्यांचा मिलाप अतिशय रुचकर चविष्ट पदार्थ झाला होता.. मस्त कुडुम कुडुम वडे सगळ्यांना च खुप भावले.... लता धानापुने -
-
मटकी च्या डाळीचे वडे (matkichya daliche vade recipe in marathi)
#hr#happyholi💜🧡💛#मटकीच्या डाळीचे वडे😋होली केला वड्या नैवेद्य असतो म्हणून मी केले. Madhuri Watekar -
तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi)
#मकर थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळण्यासाठी पदार्थात तिळाचा भरपुर वापर करावा त्यासाठीच भोगी व संक्रात ह्या सणांमध्ये तिळाचे पदार्थ केले जातात व खाल्ले जातात चला तर तिळाची चटणी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
खारं वांग (khara vanga recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी#भरलं वांग हा किवर्ड घेऊन मी खारं वांग बनवलं आहे.हे वांग थोडं वेगळं असत. हे कोरडं असत आणि त्यातला मसाला ही वेगळा असतो. Shama Mangale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16279576
टिप्पण्या
Nice Sharing