शेवयांचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#BRK
सकाळच्या नाश्त्यासाठी शेवयांचा उपमा हा उत्तम पर्याय आहे.विविध प्रकारचे तयार ब्रँड्स बाजारात मिळतात.त्याही या उपम्यासाठी वापरु शकतो.तसंच घरगुती पद्धतीने केलेल्या जाड शेवयाही यासाठी घेता येतात.
रात्रीच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर शरीरास एनर्जीची आवश्यकता असते.कार्ब्ज,प्रोटीन्स,व्हिटॅमिन यांनी युक्त अशा नाश्त्याने दिवसभराची सुरुवात करणे फायदेशीर असते.काहीवेळा डाएटच्या नावाखाली ब्रेकफास्ट केला जात नाही,सकाळी घाई गडबडीमुळे खाण्यास वेळ मिळत नाही या सगळ्यामुळे शरीराची पित्तवृत्ती वाढते व पुढील आजारही वाढतात.यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट चुकवू नये.दिवसभर ताजेतवाने रहाण्यासाठी ब्रेकफास्ट हवाच!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
5व्यक्ती
  1. 3 कपजाड शेवया
  2. 3 टेबलस्पूनसाजूक तूप शेवया भाजण्यासाठी
  3. 3-4 टेबलस्पूनतेल फोडणीसाठी
  4. 2मध्यम कांदे
  5. 1मोठा टोमॅटो
  6. 1ढोबळी मिरची
  7. 8-10कोवळ्या बीन्स
  8. 4हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  9. 7-8कढीपत्ता पाने
  10. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  11. 2 टीस्पूनमीठ
  12. 2 टीस्पूनसाखर
  13. 3-4 कपउकलेले पाणी
  14. फोडणीसाठी जीरे
  15. 1टीस्पून,हिंग -1/2टीस्पून
  16. 2 टीस्पूनओले खोबरे गार्निशींगसाठी

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    शेवयांचा उपमा करण्यासाठी वरील साहित्याप्रमाणे सर्व पूर्वतयारी करुन घ्यावी.सर्व भाज्या बारीक चिराव्यात. याशिवाय आणखीही भाज्या आवडीनुसार घालता येते तात.

  2. 2

    कढई तापवून त्यात तूप घालावे व शेवया खमंग,कुरकुरीत, गुलाबीसर रंगावर भाजून घ्याव्यात.भाजून झाल्या की एका ताटात बाजूला काढून ठेवाव्यात.

  3. 3

    त्याच कढईत तेल घालून जीरे,हिंग,कढीपत्ता घालून फोडणी करुन घ्यावी. आता यावर कांदा घालून मऊ शिजवून घ्यावा.आता यावर बीन्स,ढोबळी मिरची घालून 3-4मिनिटे परतावे.या भाज्या शिजायला थोडा वेळ लागतो.

  4. 4

    यावर टोमॅटो घालून एक वाफ आणावी.

  5. 5

    शिजलेल्या भाज्यांवर आता भाजलेल्या शेवया घालाव्यात. त्यावर साखर,मीठ व थोडी कोथिंबीर घालावी.परतावे.

  6. 6

    पाणी उकळून यावर घालावे.पाणी थोडे थोडे करुन घालावे.जास्त झाल्यास शेवया मोकळ्या रहाणार नाहीत.2-3मिनिटे झाकण ठेवावे व वाफ येऊ द्यावी.

  7. 7

    सर्व बाजूंनी हलवून उपमा सारखा करावा.शेवयांचा उपमा तयार आहे.

  8. 8

    गरम उपमा ब्रेकफास्ट साठी सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes