व्हेजी -चीजी गार्लिक बन्स (Veg Cheesy Garlic Buns Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#LOR
उरलेल्या वडापावच्या पावापासून मी हे बन्स तयार केलेत अतिशय टेस्टी व सुंदर झालेत

व्हेजी -चीजी गार्लिक बन्स (Veg Cheesy Garlic Buns Recipe In Marathi)

#LOR
उरलेल्या वडापावच्या पावापासून मी हे बन्स तयार केलेत अतिशय टेस्टी व सुंदर झालेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1सिमला मिरची,अर्ध वाटी मक्याचे दाणे, एक टोमॅटो, एक कांदा
  2. 6पाव
  3. 6लसणाची पाकळ्या
  4. 2 टीस्पूनचिलीफ्लेक्स
  5. 2 टीस्पूनमिक्स हर्ब
  6. 1 वाटीमोझरेला चीज
  7. 1 टेबलस्पूनबटर
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    कांदा,टोमॅटो सिमला मिरची बारीक कापून घ्यावी मक्याचे दाणे उकळत्या पाण्यात पाच मिनिटांसाठी मीठ टाकून उकळून घ्या व निथळत ठेवावे

  2. 2

    मोठ्या गॅसवर फ्राय पॅनमध्ये थोडसं बटर टाकून या सर्व भाज्या दोन मिनिट साठी परतून घ्याव्या त्यात चिली फ्लेक्स व मीठ घालून थंड करून ठेवावे

  3. 3

    थंड झालेल्या भाज्या व चीज एकत्र करून रेडी ठेवावे पावाला आडव्या दोन व उभ्या दोन असे काप करावेत व त्या कापामध्ये या भाज्या भराव्यात व रेडी ठेवाव्यात तोपर्यंत लसूण ठेचून ते बटर मध्ये मिक्स करून ठेवावा

  4. 4

    फ्राय पॅनमध्ये एक चमचा खाली बटर घालून त्यामध्ये हे बन्स ठेवून वरती ही गार्लिक बटर घालून मध्यम गॅसवर पाच मिनिटांसाठी हे झाकून ठेवावे पाच मिनिटांनी चीज वितळून छान होतो व खालील भाग क्रिस्प होतो खाण्यासाठी रेडी होतो अतिशय टेस्टी सुंदर बन्स तयार होतात त्यावर चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब्ज घालून खावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes