चायनीज - इन्स्टंट क्रीमी स्वीटकॉर्न सूप (Instant Creamy Sweet Corn Soup Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#CHR
हॉटेल मध्ये सूप घेताना खूप छान अशा चवी पहायला मिळतात.चायनीज सूप्समध्ये जास्त क्रीम नसते.तसेच आंबट-तिखट अशा चवीची ही सूप्स हेल्दीही असतात.जोडीला कुरकुरीत नूडल्स या सूप्सची रंगत वाढवतात.लंगफंग,माँच्यॉव,वॉनटन,स्वीटकॉर्न, हॉट एँड सोर ,स्वीटकॉर्न सूप्स सगळ्यांना आवडतात.
आज हेल्दी असे चायनीज स्वीटकॉर्न सूप सिंगापूरी नूडल्स बरोबर केले आहे.नूडल्स बरोबर सूप हे हवेच!पावसाळ्यात भरपूर स्वीटकॉर्न बाजारात आलेले असतात.कॉर्न्स थोडे क्रीमी असतातच.या सूपमध्ये थोडा वेगळेपणा आणण्यासाठी याचा बेस म्हणून रेडी सूप मिक्स वापरले आहे.याने सूपला दाटपणा छान येतो.बघा करुन....आणि आवडतेय का सांगा😋😊🥣

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिटे
5व्यक्ती
  1. 5रेडी टु कुक कॉर्नसूप छोटे पँक्स
  2. 1/2 टीस्पूनसोया सॉस
  3. 2 टीस्पूनव्हिनिगर
  4. 4गडद हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
  5. 2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  6. 2 टीस्पूनमीठ
  7. 2 टीस्पूनसाखर
  8. 1 टीस्पूनमीरेपूड
  9. 1 कपपाणी-सूप प्रिमिक्समध्ये घालण्यासाठी
  10. 3/4 लीटरउकळलेले पाणी - सूपसाठी
  11. 1/2 कपकच्चे मक्याचे दाणे
  12. 1 कपमक्याचे दाणे - मिक्सरमध्ये क्रश केलेले
  13. 2 टेबलस्पूनबटर
  14. 1 टेबलस्पूनतीळाचे तेल/गोडेतेल
  15. 2 टेबलस्पूनचिरलेली कांदापात गार्निशिंग साठी

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    चायनीज स्वीटकॉर्न सूप करण्यासाठी रेडी टू मेक स्वीटकॉर्न packs घ्यावेत.तसेच सूपला लागणारे सर्व साहित्य वर सांगितल्याप्रमाणे तयार ठेवावे.कॉर्न कच्चेच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत.

  2. 2

    सूप पँक उघडून एका बाऊलमध्ये काढावेत.यात सोया-सॉस,व्हिनेगर, मीरेपूड, मीठ व साखर घालावे.यात पाणी घालून बीटरने एकजीव करावे.

  3. 3

    आता कढईत तेल घालून गरम करावे.यावर बटर घालून त्यात आलं-लसूणपेस्ट व बारीक चिरलेली मिरची घालून परतावे.यावर कच्चे कॉर्न्स घालावेत व दोन मिनिट परतावे.त्यानंतर क्रश केलेले मिक्सरमधील कॉर्न्स घालून परतावे. व दोन तीन मिनिटे हलवावे.

  4. 4

    यामध्ये तयार केलेले सूप प्रिमिक्स घालावे.दोन मिनिटे उकळू द्यावे.नंतर उकळलेले पाणी घ्यावे.सूपमध्ये घालून जेवढे दाट किंवा पातळ हवे आहे त्याप्रमाणे पाणी घालून सारखे करावे.व पाच मिनिटे उकळू द्यावे.

  5. 5

    टीप :
    कॉर्नफ्लोअर न घालता सूप प्रिमिक्स वापरल्यामुळे जास्त दाटपणा व वेगळी अशी छान चव या सूपला आली आहे.
    कॉर्नफ्लोअर वापरायचे असल्यासही सोयासॉस,व्हिनेगर, मीरपूड,साखर,मीठ घालून लागेल तेवढे पाणी घालून दाटसर बेस तयार करता येतो.

  6. 6

    गरमागरम चायनीज स्वीटकॉर्न सूप तयार आहे!नूडल्स,फ्राईड राईस या अगोदर एपेटायझर म्हणून कांदापातीचे गार्निशिंग करुन सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes