मेथी-पनीर पराठा (Methi Paneer Paratha Recipe In Marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

मेथी-पनीर पराठा (Methi Paneer Paratha Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
2 ते 3 सर्व्हिंग्ज
  1. स्टफिंगसाठी लागणारे साहित्य
  2. 2 टेस्पूनतेल
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. 1 वाटीमध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
  5. 1 टेस्पूनबारीक चिरलेली लसुण पाकळी
  6. 1बारीक चिरलेली हिरवी मिरची
  7. 1 कपमेथीची पाने
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टेस्पूनतिखट
  10. 1/2 टीस्पूनकिचन किंग मसाला
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 कपकिसलेले पनीर
  13. चवीनुसारमीठ
  14. पराठा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  15. 1 कपकणिक
  16. 1 टीस्पूनजीरे
  17. चवीनुसारमीठ
  18. 1 टेस्पूनतेल
  19. थोडेसे पाणी

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम कणकेमध्ये जीरे, तेल, चवीपुरते मीठ आणि थोडे पाणी घालून पराठ्यासाठी कणिक मळून घ्यावी आणि 5 ते 10 मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवावी.

  2. 2

    आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात जीरे घालावे. जीरे तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत 2 मिनिटे परतून घ्यावा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालावे.

  3. 3

    आता त्यात हिरवी मिरची आणि स्वच्छ धुतलेली मेथीचे पाने घालून दोन ते तीन मिनिटे भाजी परतून घ्यावी.

  4. 4

    आता त्यात हळद, तिखट, किचन किंग मसाला आणि गरम मसाला घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि गॅस बंद करून घ्यावे. (किसलेले पनीर घालण्याआधी गॅस बंद करून घ्यावा, जेणेकरून पनीर जळणार नाही.)

  5. 5

    आता त्यात किसलेले पनीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे. आपले स्टफिंग चे सारण तयार आहे.

  6. 6

    आता मळलेल्या कणकेची छोटी पोळी लाटून त्यात हे स्टफिंगचे सारण मधोमध भरून पोळीची किनार सर्व बाजूंनी दुमडून व्यवस्थित बंद करून घ्यावी.

  7. 7

    त्याला थोडी कणिक लावून पोळी लाटून घ्यावी. गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवून त्यावर पोळीला दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस भाजून घ्यावी.

  8. 8

    पराठ्याचे मधोमध कट करून चार भाग करून घ्यावे आणि सर्व्हिंग डिश मध्ये काढून गरमागरम पराठा सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

Similar Recipes