मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#EB1
#w1

#मेथीपनीरपराठा

रेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा
रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.
तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीट
3 व्यक्ति
  1. 1 कपमेथीची भाजीची पाने स्वच्छ करून बारीक चॉप केलेली
  2. 1कांदा बारीक चॉप केलेला
  3. 1/2 कपपनीर किसलेले
  4. 1 टीस्पूनप्रमाणे मसाले हळदी पावडर
  5. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  6. 1 टेबलस्पून धणे पावडर
  7. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 टेबलस्पूनगव्हाचे मळलेले पीठ
  10. तेल पराठे भाजण्यासाठी

कुकिंग सूचना

45 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम मेथीची भाजीची पाने स्वच्छ करून धुवून बारीक चॉप करून घेऊ

  2. 2

    नंतर एका बाऊलमध्ये मेथीची पाने, पनीर,बारीक केलेला कांदा एकत्र टाकून घेऊ

  3. 3

    दिल्याप्रमाणे सगळे मसाले,मीठ टाकून हाताने व्यवस्थित मिक्स करून स्टफिंग तयार करून घेऊ

  4. 4

    आता गव्हाचे पीठ तेल टाकून मळून घ्या. दोन लाटी करून घेऊ, पोळपाटावर पोळी सारख्या दोन्ही पोळी लाटून घ्या. एका पोळीवर तयार केलेल्या स्टफिंग पसरून घेऊ. वरून दुसरी पोळी चिटकून पराठा साईडने बंद करून तयार करून घेऊ.

  5. 5

    आता तापलेल्या तव्यावर तेल टाकून पराठा भाजून घेऊ. एक या पद्धतीने पराठा तयार केला आणि एक आत मध्ये स्टफ करून लाटून तव्यावर भाजून पराठा तयार केला असे दोन पद्धतीने पराठे तयार केले

  6. 6

    तयार पराठा कोथंबीर पुदिन्याची चटणी, दही आणि लोणच्याबरोबर सर्व केले

  7. 7

    तयार हेल्दी असा हा मेथी आणि पनीरचा स्टफ पराठा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes