जाळीदार खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

जाळीदार खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
  1. सव्वा कप बेसन
  2. 2 टेबलस्पूनतेल
  3. 3 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टेबल स्पूनमीठ
  5. 1 टेबलस्पूनसायट्रिक ऍसिड
  6. 1/2 टेबलस्पूनखाण्याचा सोडा
  7. 1 कपपाणी
  8. तडका देण्यासाठी
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. 1 टेबलस्पूनजिरं मोहरी
  11. चिमूटभरहिंग
  12. 7ते आठ कढीपत्त्याचे पान
  13. 1ते दोन मिरची बारीक कट केलेली
  14. 2 टेबलस्पूनपाणी
  15. सजावटीसाठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम एक मोठा बाऊल घेऊन त्यात बेसन घ्यावे

  2. 2

    नंतर या बेसनात मीठ साखर व सायट्रिक ऍसिड घालावे

  3. 3

    नंतर सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे त्यात दोन चमचे तेल घालावे ते पण मिश्रण मिक्स करून घ्यावे नंतर त्यात एक कप पाणी घेऊन ते एकदम न टाकता लागत लागत घालावे व ढोकळ्याचे पीठ भिजवून घ्यावे दहा मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवावे

  4. 4

    नंतर ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यावे व कुकरमध्ये किंवा एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवावे

  5. 5

    दहा मिनिटांनी ढोकळ्याचे भिजवलेले पीठ परत मिक्स करून घ्यावे छान हलवून घ्यावे म्हणजे फुलते त्यात आता सोडा घालावा व परत पीठ मिक्स करून घ्यावे नंतर ग्रीस केलेल्या भांड्यात घालावे व कुकरमध्ये किंवा भांड्यात ढोकळा करायला ठेवावा वीस मिनिटं ठेवावे

  6. 6

    तोपर्यंत एक पतडका घेऊन त्यात तेल घालावे मोहरी जीरे घालावे तडतडले की त्यात हिंग घालावा मिरची घालून घ्यावी कढीपत्ता घालावा गॅस बंद करून घ्यावादोन चमचे पाणी घालावे

  7. 7

    वीस मिनिटांनी सुरीच्या साह्याने चेक करून बघावे ढोकळा शिजला का ढोकळ्याचे पीठ शिजल्यानंतर त्यावर तडका द्यावा

  8. 8

    सुरीने ढोकळ्याचे काप आकार कापून घ्यावे

  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes