हाय प्रोटीन अडई विथ रेड चटणी (Adai With Red Chutney Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#SIR
सगळ्यांना hello🙋
खूप दिवसांनंतर रेसिपी पोस्ट करते आहे.
साऊथ इंडियन पदार्थ सगळ्यात आवडते!कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होणारे.म्हणलं तर स्ट्रीट फूड,म्हणलं तर एकदम स्टँडर्ड हॉटेलमध्ये मिळणारं आणि खूप हौशी लोकांसाठी घरीही सहज करता येणारं...म्हणजे साऊथ इंडियन फूड.शिवाय पोटभरीचं.ब्रेकफास्ट, लंच,डिनर,स्नँक्स या सगळ्या वेळी चालणारं.कधी मेन डीश तर कधी साईड डीश!घरात मोठा डबाभर इडली-डोशाचे पीठ करुन फ्रीजमध्ये ठेवलं तर अधूनमधून सहज पदार्थ करता येतात.फरमेंट केल्यामुळे साऊथ इंडियन पदार्थ सगळे प्रोटीन रिच!उडीद डाळ,हरभरा डाळ या मुख्यत्वे वापरल्या जाणाऱ्या डाळी.तांदूळही भरपूर प्रमाणात वापरतात,त्यामुळे कार्ब्ज आणि प्रोटिनयुक्त अशी हा पौष्टिक डीश बनते. 'अडई'हा इन्स्टंट डोशासारखाच फरमेंट न करता सहज होणारा प्रकार....सर्व डाळी,तांदूळ भिजवून, वाटून लागलीच करता येणारा पदार्थ!!खूप फरमेंटेशन नसल्याने कमी एसिडीक....अगदी चटकन होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ... नारळाची ओली चटणी किंवा लाल चटणी बरोबर सहज आवडेल असा!चला तर करुन पहा प्रोटीन्स रिच अडई😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1:30तास
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपउकडा तांदूळ
  2. 1 कपहरभरा डाळ
  3. 1 कपमूग डाळ
  4. 1/2 कपउडीद डाळ
  5. 1/2 कपतूर डाळ
  6. 1/2 कपमसूर डाळ
  7. 4-5लाल ब्याडगी मिरची
  8. 1 कपओला नारळ चव
  9. 1 टीस्पूनमेथ्या
  10. 1.5 टीस्पूनमीरे पूड
  11. 2-3 टीस्पूनमीठ
  12. 1/2 कपकढीपत्त्याची ताजी पाने
  13. 1/4 कपकोथिंबीर चिरुन
  14. पाणी जरुरीनुसार
  15. 1/2 वाटीतेल
  16. रेड चटणी
  17. 2 टीस्पूनगोडेतेल
  18. 1 टीस्पूनजीरे
  19. 1 कपखोवलेला नारळ
  20. 2 लहानकांदे उभे पातळ चिरुन
  21. 3टोमॅटो बारीक चिरून
  22. 3 टीस्पूनहरभरा डाळ
  23. 1 टीस्पूनउडीद डाळ
  24. 1/4 कपकढीपत्ता
  25. 4लाल मिरच्या
  26. 1ते1.5 टीस्पून मीठ
  27. 1 टीस्पूनसांबार मसाला

कुकिंग सूचना

1:30तास
  1. 1

    तांदूळ व सर्व डाळी वरील प्रमाणानुसार घ्याव्यात.स्वच्छ धुवून घ्याव्यात.पुरेसे पाणी घालून ७-८तास भिजवावे.भिजतानाच मेथ्या व ब्याडगी मिरच्या घालाव्यात.

  2. 2

    तांदूळ, डाळी,मिरच्या व कढीपत्ता एकत्र बारीक वाटून घ्यावे.वाटलेल्या मिश्रणात जीरे,मीरेपूड,ओला नारळ चव,कोथिंबीर घालावी.मीठ घालावे.सर्व मिश्रण हलवून घ्यावे.

  3. 3

    नॉनस्टिक तवा तापवून तेल लावावे.डावभर मिश्रण तव्यावर घालून पसरावे. कडेने थोडे तेल सोडावे.अडई लगेच सुटून येते.खमंग कुरकुरीत होईपर्यंत ठेवावे.

  4. 4

    रेड चटणी:
    छोट्या पँनमध्ये तेल घालावे.तापल्यावर जीरे घालून तडतडू द्यावेत.हरभरा डाळ,उडीदडाळ घालून गुलाबी होईपर्यंत भाजावे.त्यात कढीपत्ता व मिरच्या घालाव्या व छान भाजून घ्यावे.त्यावर कांदा व टोमॅटो घालावे.व मऊ होईपर्यंत परतावे.

  5. 5

    त्यावर मीठ,हळद,सांबार मसाला घालावे. सर्व मिश्रण एकत्र करावे.मिक्सरमध्ये खोवलेला नारळ व सर्व मिश्रण घालावे.थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटावे.

  6. 6

    रेड चटणी तयार आहे.
    गरमागरम अडई बरोबर रेड चटणी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes