मोड आलेल्या मुगाची झडपट सुक्की भाजी (Sprouted Mugachi Sukki Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

#CCR
प्रतिकारशक्ती वाढवते मूग डाळीमध्ये विशेष गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत ठेवतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी आणि फ्लूची समस्या दूर राहण्यास मदत होते, त्यामुळे नेहमी आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाच्या डाळीचा समावेश नक्की करावा.
#CCR

मोड आलेल्या मुगाची झडपट सुक्की भाजी (Sprouted Mugachi Sukki Bhaji Recipe In Marathi)

#CCR
प्रतिकारशक्ती वाढवते मूग डाळीमध्ये विशेष गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत ठेवतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी आणि फ्लूची समस्या दूर राहण्यास मदत होते, त्यामुळे नेहमी आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाच्या डाळीचा समावेश नक्की करावा.
#CCR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ ते ५
  1. 4मध्यम आकाराचे टोमॅटो (पेस्ट केली)
  2. 1 वाटीपाणी
  3. 2कांदे मध्यम आकाराचे
  4. कोथिंबीर
  5. 1बटाटा
  6. 2 छोटे चमचे तिखट मसाला
  7. १ छोटा चमचा कांदा लसुण मसाला
  8. चिमुटभरहिंग
  9. 2 वाटीभिजवून मोड काढलेले मुग
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम मोड आलेले मूग धुवून घेतले. एक बटाटा सोलुन बारीक करून धुवून घेतला.

  2. 2

    गॅस वर मंद आचेवर कूकर ठेवून त्यात तेल ओतले मग त्यात कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा २ ते ३ मिनिट परतवून घेतला मग त्यात टोमॅटो पेस्ट टाकली. व परतवून घेतली. मग त्यात मसाले टाकले मीठ टाकले व ५ मिनिट परतवून घेतले.

  3. 3

    नंतर त्यात मोड आलेले मूग व बटाटा टाकून चांगले परतवले मग एक वाटी पाणी टाकले व कूकर बंद करून 2 शिट्या काढून घेतल्या. गरमा गरम तयार मोड आलेल्या मुगाची सुककी भाजी. वरतून कोथिंबीर टाकली.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes