राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#WWR
साजूक तुपात केलेला राजमा आणि त्याबरोबर गरम गरम भात म्हणजे थंडीच्या दिवसातली मेजवानी

राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)

#WWR
साजूक तुपात केलेला राजमा आणि त्याबरोबर गरम गरम भात म्हणजे थंडीच्या दिवसातली मेजवानी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीरात्रभर भिजलेला राजमा
  2. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  3. 1 चमचाकसुरी मेथी
  4. 1 चमचाजीरे ,चिमूटभर हिंग
  5. 2टोमॅटो,एक कांदा,दहा लसणाच्या पाकळ्या, एक इंच आलं बारीक वाटलेलं
  6. 1/2 वाटीकोथिंबीर बारीक कापलेली
  7. 6मिरी, दोन इंच दालचिनी,दोन हिरवी वेलची,अर्ध चक्रीफुल,एक लवंग
  8. चवीनुसारमीठ,सुपारी एवढा गुळ
  9. 1/4 चमचाहळद, दीड चमचा राजमा मसाला
  10. 2 वाटीबासमती तांदळाचा शिजवलेला साधा भात

कुकिंग सूचना

3मिनिट
  1. 1

    प्रथम राजम्यात मध्ये थोडं पाणी घालून त्यामध्ये सर्व खडे मसाले घालावे वेलची मिरी दालचिनी चक्री फुल लवंग वेलदोडा व कुकरला चार ते पाच शिट्ट्या कराव्या. कुकर थंड झाला की राजमाचे दाणे बाहेर काढून शिजले का बघावे

  2. 2

    मग भाजीच्या कुकरमध्ये साजूक तूप घालून त्यामध्ये जीरे व हिंग घालावे व कांदा टोमॅटो आलं लसणाचे वाटण घालावं छान परतावं त्यामध्ये कसुरी मेथी हातावर चोळून घालावी हळद व राजमा मसाला घालावा मीठ व गूळ घालावं व तूप सुटू लागलं की शिजलेला राजमा त्यात घालून अर्धी कोथिंबीर घालावी व लागेल तेवढं गरम पाणी घालावं व कुकरचे झाकण लावून अजून चार शिट्ट्या कराव्यात

  3. 3

    कुकर थंड झाला की झाकण काढावं व उरलेली कोथिंबीर त्यात घालावी गरम गरम भातावर हा राजमा व कच्चा कांदा अतिशय टेस्टी व सुंदर असं कॉम्बिनेशन होतं व टेस्टी लागतं हेल्दी असतं. माझ्या मसाल्यामध्येच तिखट असल्यामुळे वेगळं तिखट घालण्याची गरज नाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes