कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#NVR
अळूची पाने (Taro Leaf) हे पचनास खूपच चांगली असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच. पण याच अळूच्या पानांमध्ये बरेच व्हिटामिन्स आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. इतकच काय तर आपल्या शरीरातील अनेक व्याधी दूर करण्यासाठी या अळूच्या पानांची भाजी खूपच गुणकारी आहे.
अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात
अळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.
रक्त वाढवणे, ताकद वाढवणे यासाठी अळू भाजी उपयोगी ठरते.
तर आपण आज अळूच्या पानाचे कोकणातील प्रसिद्ध असे अळूचं फदफद पाहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
तीन ते चार
  1. अळूचे पाच ते सहा पाने
  2. 1/2 कपहरभरा डाळ
  3. थोडे शेंगदाणे
  4. 1ते दोन चिंच
  5. थोडा चवीनुसार गूळ
  6. लसूण अद्रक पेस्ट
  7. 1/4 कपओल्या खोबऱ्याचा चव
  8. 1/2 टेबलस्पूनहळद,एक टेबलस्पून धने पावडर
  9. 1 टेबलस्पूनजीरे मोहरी
  10. 1 टेबलस्पूनमिरची पावडर अर्धा टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
  11. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  12. चवीनुसारमीठ
  13. 2 चमचेतेल
  14. चिमूटभरहिंग
  15. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावे मधले देठ काढून घ्यावे व उभी चिरून घ्यावी

  2. 2

    ओल्या खोबऱ्याचा चव करून घ्यावा चिंच व गुळ भिजत टाकावे आले लसणाची पेस्ट करून घ्यावी हरभऱ्याची डाळ अर्धा तास आधी भिजत घालावे

  3. 3

    कुकर घेऊन कुकरमध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळ चिरलेली अळूची पाने व शेंगदाणे घालून घ्यावे आवश्यकतेनुसार पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या घेऊन घ्याव्या

  4. 4

    कुकर थंड झाल्यानंतर डाळ छान घोटून घ्यावी नंतर एक पातेले घेऊन त्यात तेल घालावे जीरे मोहरी घालावे अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यावे हिंग घालावा सर्व मसाले घालून घ्यावे चिंच गूळ घालून हाटलेली डाळ घालून घ्यावी

  5. 5

    वरून ओल्या खोबऱ्याचा चव घालावा थोडे आवश्यकतेनुसार पाणी घालावे पाच ते दहा मिनिटे शिजू द्यावे छान अळूचे फदफदे तयार भाजी भाकरी किंवा भातासोबत गरम गरम खाऊ शकतात

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes