खमंग बाजरी वड्या (Bajri Vadya Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#HV

बाजरी हे धान्य हिवाळ्यातील उत्तम टॉनिक आहे . त्यांत मॅग्नेशियम ,फॉस्फरस , प्रोटीन व विपुल प्रमाणात कॅल्शियम असते .मधुमेह , चरबी आम्लपित्त , अशा अनेक आजारात उपयुक्त आहे. बाजरीच्या , झटपट पण खमंग वड्या बनविल्या आहेत .तुम्हालाही त्या आवडतील . चला कृती पाहू ..

खमंग बाजरी वड्या (Bajri Vadya Recipe In Marathi)

#HV

बाजरी हे धान्य हिवाळ्यातील उत्तम टॉनिक आहे . त्यांत मॅग्नेशियम ,फॉस्फरस , प्रोटीन व विपुल प्रमाणात कॅल्शियम असते .मधुमेह , चरबी आम्लपित्त , अशा अनेक आजारात उपयुक्त आहे. बाजरीच्या , झटपट पण खमंग वड्या बनविल्या आहेत .तुम्हालाही त्या आवडतील . चला कृती पाहू ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 - 6 व्यक्ती
  1. 1 कपबाजरी पीठ
  2. 1 टीस्पूनतांदूळ पीठ
  3. 1/2 टीस्पूनगहू पीठ
  4. 1 टेबलस्पूनखोबरे किस
  5. दीड टीस्पून लाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनधणेजिरे पूड
  7. 1/4हळद
  8. चिमूटभरहिंग
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. जेवढे पीठ तेवढे पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    बाजरी, तांदुळ व गहू ही तिन्ही पिठं, छान मिक्स करा.
    गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल तापवा, हिंग, मोहरी, जीरे टाकून खमंग फोडणी करा. त्यांत हळद, तिखट, धने जिरेपूड व मीठ टाकून, त्यांत पाणी ओता.

  2. 2

    पाण्याला आधण आल्यावर, गॅसफ्लेम बरीक करून, त्यांत बाजरी, तांदूळ, गहू पिठाचे मिश्रण टाकून ते व्यवस्थित कालवा. गुठळी होऊ देऊ नका. कढईवर झाकण झाकून, 2 - 4 मिनिटे पिठाला छान वाफ येऊ द्या.
    एका ताटाला तेलाचे ग्रीसिंग करा. 2 -4 मिनिटांनी झाकण उघडून, शिजलेले पिठ चांगले मिक्स करा.

  3. 3

    शिजलेल्या पिठाचा गोळा, तेल लावलेल्या ताटात ओता. वाटीला तेल लावून एकसारखे छान थापून घ्या. 2 मिनिटांनी त्याच्या सुरीने वड्या कापा. थोड्याशा गार झाल्या कीं उलथन्याने हलक्या हाताने काढून, वड्या प्लेटमध्ये ठेवा.

  4. 4

    प्लेट मधल्या वड्यांवर खोबरे कीस व बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा. खमंग व पौष्टिक बाजरी वड्यांची लज्जत चाखा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes