तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#HV
हिवाळ्यात सगळ्याच भाज्यांची भारी मज्जा असते. हिरव्या कंच तुरी, हिरवा वाटाणा, लिंबू, गाजर आणि बरेच काही...

तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi)

#HV
हिवाळ्यात सगळ्याच भाज्यांची भारी मज्जा असते. हिरव्या कंच तुरी, हिरवा वाटाणा, लिंबू, गाजर आणि बरेच काही...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 व्यक्तींसाठी
  1. 200 ग्रामतुरीचे दाणे
  2. 2 टेबलस्पूनतेल
  3. 1हिरवा कांदा पातीसह
  4. 1 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  5. 6 ते 7 हिरव्या मिरच्या
  6. 1 बारीक चिरून
  7. 1 टिस्पून जीरे
  8. 1 टीस्पूनहळद
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथिंबीर, पाणी

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम तुरीचे दाणे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.टोमॅटो चिरून घ्या.कांदा धूवून चिरून घ्या. हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घ्यावी.

  2. 2
  3. 3

    त्यानंतर एका पातेल्यात तेल गरम करून जीरे घालावे. त्यानंतर हिरवा कांदा, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि आले लसुण पेस्ट घालून मिक्स करून घ्यावे. टोमॅटो घालून 2 मिनिट शिजवून घ्यावे. हळद आणि मीठ घालुन मिक्स केल्यावर तुरीच्या दाण्यांची पेस्ट घालून 2 मिनिट परतून घ्यावे.

  4. 4

    त्यानंतर गरम पाणी घालून 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यावे. अर्धवट झाकून ठेवावे. शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. गरम गरम आमटी भाताबरोबर सर्व्ह करावी.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

टिप्पण्या

Similar Recipes