बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#बाजरी_आणि_गव्हाच्या_पिठाच्या_गोड_कापण्या

बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi)

#LCM1
#बाजरी_आणि_गव्हाच्या_पिठाच्या_गोड_कापण्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1 वाटीबाजरीचे पीठ
  2. 2 वाट्याकणीक
  3. 1 वाटीगुळ
  4. 1 वाटीतूप
  5. 1 वाटीदूध
  6. वेलची पावडर
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    बाजरीचे पीठ आणि कणिक (गव्हाचे पीठ) मिक्स करून घ्यावे. गुळ चिरुन घ्यावा.

  2. 2

    बारीक चिरलेला गूळ, तूप आणि दुध मिक्स करून त्याचा पाक करावा. दुध घातल्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात.

  3. 3

    गुळाचा पाक पिठात घालून त्यात वेलची पावडर घालून पीठ घट्टसर मळून घ्यावे. पीठ घट्ट मळल्यामुळे कापण्या तळताना तुटत नाहीत. मळलेला पिठाचा गोळा १५ मिनिटे झाकून ठेवावा.

  4. 4

    मळलेल्या पिठाचा एक एक गोळा घेऊन भाकरी थापतो तेवढी जाड लाटून मग कटरच्या सहाय्याने लांबट आकाराच्या कापण्या कापाव्या. गरम तेलामधे खरपूस भाजून घ्याव्या. (कापण्या लाटताना वरुन खसखस लावावी,‌ कापण्या छान दिसतात माझ्या कडे खसखस नव्हती म्हणून मी लावली नाही)

  5. 5

    गरमागरम खुसखुशीत गोड कापण्या खायला खूप छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes