बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#LCM1
कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक गुळ घालून केलेल्या बाजरीच्या कापण्या....

बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)

#LCM1
कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक गुळ घालून केलेल्या बाजरीच्या कापण्या....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटी बाजरीचे पीठ
  2. 2 चमचे डाळीचे पीठ
  3. 1/2 वाटी गूळ
  4. 2 टेस्पून तूप
  5. 1 टेस्पून खसखस
  6. चवीसाठी चिमूटभर मीठ
  7. तळणीसाठी आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यात गूळ घातला व गुळ विरघळल्यावर गॅस बंद केला. गुळाचा पाक करायचा नाही तर त्याची गुळवणी तयार करुन ती गाळून घ्यावी. एका भांडयात बाजरीचे पीठ, कणिक, बडीशोप सुंठीची पूड, वेलची पूड, थोडंसं मीठ सर्व मिक्स करून त्यात तुपाचे मोहन घालावे व चांगले एकजीव करून मिक्स करुन घ्यावे. आपण पुऱ्यांसाठी भिजवतो तसे पीठ भिजवून व मळून घ्या.

  2. 2

    गॅसवर एका कढईत तळणीसाठी तेल तापत ठेवा. तेल चांगले तापले की मुरलेल्या पिठाच्या पोळ्या लाटून त्यावर खसखस लावून घ्यावी. आपण नेहमी शंकरपाळी कापतो तश्या कापण्या कापा.

  3. 3

    गरम तेलात सोडा आणि हलक्याशा ब्राऊन रंगावर तळून पेपर नॅप्किनवर काढा म्हणजे अतिरिक्त तेल शोषले जाईल.

  4. 4

    बाजरीच्या खुसखुशीत कापण्या तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes