पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

#HR1
होळी या सणाला घरोघरी पुरणपोळी बनवली जाते.
होळीच्या पवित्र अग्नी मध्ये ‌ नैवेद्य अर्पण करून अमंगळाचा नाश होवून सर्व ‌मंगल‌ व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते. महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतभर पुरणपोळी‌ या पक्वान्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
  1. 250 ग्रामचना डाळ
  2. 250 ग्रामगूळ
  3. 2 चमचेसुंठ वेलची पूड
  4. 250 ग्रामगहू पीठ
  5. 100 ग्राम‌साजूक तूप
  6. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    गव्हाचे पीठ सैलसर मळून घ्यावे.

  2. 2

    चनाडाळ स्वच्छ धुऊन शिजवून घ्यावी.

  3. 3

    त्यातील ‌पाणी काढून शिजवलेल्या डाळी मध्ये गूळ घालून पुरण करून घ्यावे सुंठ वेलची पूड घालावी.

  4. 4

    तयार मिश्रण पुरणयंत्रातून किंवा ‌ मिक्सरमधून बारीक करून घ्यावे

  5. 5

    कणकेचा उंडा घेऊन त्यात पुरण भरून
    पोळपाटावर पुरणपोळी ‌लाटून घ्यावी

  6. 6

    गॅस वर तवा ठेवून त्यावर तयार केलेली पुरणपोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी कडेने साजूक तूप सोडावे.

  7. 7

    नैवेद्य दाखवून साजूक तूप आणि दूध किंवा आपल्या आवडीप्रमाणे ‌ खाण्यासाठी तयार आहे पुरणपोळी.

  8. 8

    शिजवलेल्या डाळीचे पाणी वाटण घालून चविष्ट कटाची आमटी तयार करावी.भुरका मारून खावी इतकी चवदार बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes