पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम चणाडाळ
  2. ५०० ग्रॅम गूळ
  3. तेल
  4. तुप
  5. पीठ मळण्यासाठी कणिक आणि मैदा सम प्रमाणात घेऊन पीठ मळावे
  6. आमटी फोडणीसाठी
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. कडिपत्ता
  10. 2 टीस्पूनतिखट पूड
  11. 2 टीस्पूनगोडा मसाला
  12. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    चणाडाळ दोन तास भिजवून मग कुकरमधे चार शिट्या काढून शिजवून घेतली. मग शिजलेल्या डाळीतले पाणी ज्याला "पुरणाचा कट" म्हणतात ते दुसऱ्या भांड्यात गाळून ठेवले. आणि शिजलेल्या डाळीत तेवढाच गुळ घालून मिक्स करून पुरण सतत ढवळून शिजवून घेतले. पुरण शिजल्यावर त्यात डाव रुपवल्यावर जर तो डाव न पडता उभा राहिला तर पुरण चांगले शिजले आहे असे समजावे.

  2. 2

    पुरणयंत्रातून पुरण एकदम बारीक वाटून घेतले.

  3. 3

    मळलेल्या पीठाच्या गोळ्यामधे तेवढ्याच आकाराचा पुरणाचा गोळा घालून मोदका प्रमाणे बंद करून मग तांदळाचे पीठ पोलपाटावर घेऊन पुरणपोळी अलगद लाटावी. आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी.

  4. 4

    तेलात मोहरी हिंग कढीपत्ता घालून फोडणी केली मग त्यात पुरणाचा कट घातला, आणि त्यात चिंचेचा कोळ, तिखट पूड, हळद, गोडा मसाला, मीठ आणि गुळ घालून चांगली उकळी येईपर्यंत कटाची आमटी उकळली.

  5. 5

    मस्त गरमागरम पुरणपोळी, त्याबरोबर दुधाची वाटी, गरमागरम कटाची आमटी आणि वाफाळता भात या सगळ्याचा देवाला नैवेद्य अर्पण करून मग सगळ्यांनी आस्वाद घेतला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes