कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

कटाची आमटी बनविण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. देवाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण न वापरता खोबरं खडा मसाला वापरून डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्यापासून कटाची आमटी बनवतात.डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्याला कट असेही म्हणतात म्हणूनच त्यापासून बनविलेल्या आमटीला कटाची आमटी म्हणतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपडाळ शिजवलेले पाणी /कट
  2. 4-5लवंग
  3. 6-8काळी मिरी
  4. 1/2 इंचदालचिनी तुकडा
  5. 1 टीस्पूनआलं (ऑप्शनल)
  6. 2 टेबलस्पूनबारीक केलेले कोरडे खोबरे
  7. 4-5कडीपत्ता पाने
  8. 1-2तमालपत्र
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. 1/2 टीस्पूनजीरे
  14. 1/4 टीस्पूनहळद
  15. 1/8 टीस्पूनहिंग
  16. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  17. 1/2 टीस्पूनतिखट

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    मिक्सरमध्ये खोबरे बारीक वाटून बाजूला काढून ठेवावे लवंग दालचिनी काळी मिरी बारीक वाटून त्यात खोबरे कडीपत्ता आलं घालून बारीक वाटून घ्यावे.

  2. 2

    पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग हळद तमालपत्र मिक्सरमधील वाटण घालून परतावे त्यात डाळ शिजवलेले पाणी /कट तिखट धने जीरे पावडर कोथिंबीर घालून.

  3. 3

    4-5 मिनिटे उकळून घ्यावे आणि गॅस बंद करून कटाची आमटी पुरणपोळी / भाताबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes