रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २ ते २ १/२ वाट्या ओले खोबरे
  2. मध्यम आकाराचा टोमॅटो
  3. १ वाटी मटार
  4. २ १/२ वाट्या मिल्क पावडर
  5. २ वाट्या साखर
  6. सजावटीसाठी सुका मेवा आवडीनुसार
  7. २ चमचे वेलची पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका कढईत टोमॅटो ची पेस्ट घ्यावी. थोडी शिजल्यावर त्यात पाऊण वाटी ओले खोबरे घालावे. थोडे परतून घ्यावे. मग त्यात साधारण पाऊण वाटी साखर घालावी. सगळे एकजीव करून शिजवून घ्यावे. आता त्यात पाऊण वाटी मिल्क पावडर घालावी. आता सर्व छान मिळून येईल. आता थोडे आटेपर्यंत हलवत रहावे. भांड्यापासून सुटायला लागले की तूप लावलेल्या ताटली मध्ये पसरून एकसारखे थापावे.

  2. 2

    आता कढईत पाऊण वाटी ओले खोबरे घालावे. थोडे परतून घ्यावे. मग त्यात साधारण अर्धी वाटी साखर घालावी. सगळे एकजीव करून शिजवून घ्यावे. आता त्यात अर्धी वाटी मिल्क पावडर घालावी. आता सर्व छान मिळून येईल. आता थोडे आटेपर्यंत हलवत रहावे. आता अर्धा चमचा वेलची पूड टाकावी. मिश्रण भांड्यापासून सुटायला लागल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण ताटली मधील पहिल्या थरावर एकसारखे थापावे.

  3. 3

    आता कढईत १ वाटी मटार ची पेस्ट घ्यावी. थोडी शिजल्यावर त्यात पाऊण वाटी खोबरे घालून आटवावे. मग त्यात १ वाटी साखर घालावी. एकजीव झाल्यावर पाऊण वाटी मिल्क पावडर घालावी. सर्व छान एकजीव होईल. मिश्रण आटवावे. मग वेलदोडे पूड घालून अटल्यावर आधीच्या ताटली मधील पांढरा थरावर थर थापावा.
    वरून आवडीच्या सुक्या मेव्याची पखरण करावी. थोडे थंड झाल्यावर बर्फी कापावी व सर्व करावी. ही पौष्टिक वडी लहान मुलांना नक्कीच आवडेल. त्यात सुंदर रंगसंगती तर आहेच, आणि टोमॅटो, मटार, खोबरे हे पौष्टिक घटक आहेत.

  4. 4

    ह्यामधील प्रत्येक थर तुम्ही एक वेगळी वडी म्हणून सुद्धा बनवू शकता. मी फक्त मटार बर्फी सुद्धा बनवते, त्या वडीची चव काजू कतली सारखी लागते. ह्या स्वतंत्रता दिनाला किंवा प्रजासत्ताक दिनाला नक्की करा आणि घरातल्यांना आश्चर्यचकित करा. 😃

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vedashree Pore
Vedashree Pore @cook_19447149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes