फराळी ढोकळा

Renu Chandratre
Renu Chandratre @Cook18272220
Indore (MP)

#उपवास
#Onerecipeonetree
#TeamTrees उपवासासाठी बनवूया फराळी ढोकळा, ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे, प्रथमच प्रयोग आणि सफल झाला. मखाण्याच्या पीठाने तयार केलेला ढोकळा, खूपच हलका स्पोंजी आणि चविष्ट झाला. तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा, चला तर मग बघुया याची रेसिपी...

फराळी ढोकळा

#उपवास
#Onerecipeonetree
#TeamTrees उपवासासाठी बनवूया फराळी ढोकळा, ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे, प्रथमच प्रयोग आणि सफल झाला. मखाण्याच्या पीठाने तयार केलेला ढोकळा, खूपच हलका स्पोंजी आणि चविष्ट झाला. तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा, चला तर मग बघुया याची रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2वाटी मखाण्याचं पीठ
  2. 1वाटी दही
  3. 1चमचा साखर
  4. 2चमचे अद्रक मिरचीचा ठेचा / पेस्ट
  5. 1चमचा जिरे
  6. चवीनुसार मीठ
  7. 2चमचे तूप
  8. 4हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
  9. 8-10कडी पत्ते
  10. १/४ चमचा खायचा सोडा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम एका भांड्यात मखाण्याचं पीठ घ्या.

  2. 2

    पीठात दही आणि आले-मिरची पेस्ट, मीठ आणि चिमूटभर सोडा घालून व्यवस्थित ढवळून घ्या, दहा मिनिटे झाकून ठेवा...पीठ फार सैल करून नये

  3. 3

    गॅस वर एका कढईत एक ग्लास पाणी टाकून उकळायला ठेवा. एका भांड्याला तूप चोळून घ्या आणि त्याच्यात तयार ढोकळा पीठ घाला त्यावर चवीपुरते लाल तिखट भुरकून घ्या. कढईवर झाकण ठेवा आणि मंदाग्नीवर दहा ते पंधरा मिनिटं ढोकळा वाफवून घ्या

  4. 4

    ढोकळा जरा गार झाला की भांड्यात न काढून घ्या आवडीनुसार त्याचे काप करा.‌ ढोकळा फारच हलका आणि जाळीदार होतो

  5. 5

    फोडणीसाठी, एका कढईत तूप गरम करा, कडीपत्ता आणि हिरवी मिरची घालून खरपूस भाजून घ्या, आणि लगेच ढोकळ्यावर टाका आवडीनुसार सजवा आणि सर्व करा उपवासाचे फराळी ढोकळे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Renu Chandratre
Renu Chandratre @Cook18272220
रोजी
Indore (MP)
I m a 24/7 working woman, a home maker and Home Baker ..loves to cook and serve for family and friends.** I have created my YouTube channel, Garnish With Renu, Easy Tasty Cooking 🤗, plz subscribe and Press bell button iconhere is the link 👇👇👇Plz like subscribe and share 🤗 https://www.youtube.com/channel/UCmDHP_AvGY4Q9yP5hsFwJXA** I have created my FB page too..
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes