पनीर मटर मसाला

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30min
5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमपनीर
  2. 150 ग्रॅमहिरवे वटाणे
  3. 1/2 इंचआले
  4. 5-6लसून पाकळ्या
  5. 1 टीस्पूनजिरे
  6. 2 टेबलस्पूनमगज बीज
  7. 1 टेबलस्पूनकाजू
  8. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  9. 2-3हिरव्या मिरच्या
  10. 4-5कांदे
  11. 2-3टोमॅटो
  12. 1 टीस्पूनलाल तिखट
  13. 1/2 टीस्पूनहळद
  14. 2 टीस्पूनkitchen किंग मसाला
  15. 3 टेबलस्पूनतेल
  16. 1 टेबलस्पूनबटर किंवा लोणी किंवा तूप
  17. 50ml पाणी
  18. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

30min
  1. 1

    पनीर चे छोटे तुकडे cut करून, धुवून घेणे.मगज बीज आणि काजूचे तुकडे अर्धा तास भिजत पाण्यात भिजत घालणे. Receipe चे Secret ingridient मगज बीज आहे. ज्याने gravy ला छान घट्टपणा येतो आणि चव ही छान येते.

  2. 2

    कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे, चिरलेले कांदे,मिरच्या,टोमॅटो, आलं, लसून, कसूरी मेथी, मगज बीज आणि काजु घालणे. छान लालसर रंग येई पर्यंत परतणे, आर्धी वाटी पाणी घालून 5 min शिजवून घेणे.थंड झाल्यावर सर्व मिक्सर मध्ये बारीक करुन घेणे.

  3. 3

    कढई मध्ये तेल घालणे, त्यामध्ये लोणी किंवा बटर घालणे आणि हे gravy मिश्रण घालून छान परतून घेणे. त्यामध्ये हळद, लाल तिखट, kitchen king मसाला, पुन्हा कसूरी मेथी घालणे आणि छान तेल सुटेपर्यंत परतणे.

  4. 4

    नंतर चवीनुसार मीठ, हिरवे वटाणे, पनीर घालणे,थोडी साखर घालून, पाणी घालणे आणि मंद आचेवर थोडा वेळ शिजवणे. तयार आहे लज्जतदार पनीर मटर मसाला.बटर रोटी किंवा नान सोबत सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes