मटार पनीर (matar paneer recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#fdr
मी आज माझ्या सगळ्या cookpad च्या मैत्रिणी, माझ्या जवळच्या सर्व मैत्रिणी, तसेच माझी मैत्रीण विद्या आणि माझी बहीण वर्षा यांना फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मटार पनीर डेडीकेट करते, पनीरच्या भाजी मध्ये जसे गोडसर चवीचा मटार मिसळून त्याची अप्रतिम चव येते त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मैत्रिणी माझ्या जीवनामध्ये आनंद देत आहात... बर्थडे पार्टी, किटी पार्टीला आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकत्रितपणे जेवण बनवून त्याचा आनंद घ्यायचो पण या कोरोनामुळे ते सर्व बंद झाले आणि तो सुदिन परत लवकरच येवो हीच सदिच्छा.....पार्टीसाठी किंवा जास्त जणांसाठी मटार पनीर बनवायचे असेल तर अशाप्रकारे मटार पनीर बनवा.... खूपच छान झाले आहे...आत्ता ह्या सगळ्या जणी भेटून कधी याचा आस्वाद घेतो याची प्रतीक्षा....🙏🙏🥰🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
10 सर्व्हिंग्ज
  1. २५० ग्रॅम मटार (जास्त ही घेऊ शकता)
  2. ५०० ग्रॅम पनीर
  3. 3मोठे कांदा
  4. 6टोमॅटो
  5. 10काजू
  6. 2टेबलस्पून मगज बी
  7. 10-12लसून पाकळ्या
  8. 2इंच आले
  9. 2टेबलस्पून क्रिम
  10. 2टीस्पून गरम मसाला
  11. 3टीस्पून लाल मिरची पावडर
  12. 3टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
  13. 2टीस्पून किचन किंग मसाला
  14. तेल
  15. तूप
  16. तमालपत्र
  17. दालचिनी
  18. जीरे
  19. वेलदोडा
  20. 2टीस्पून कसूरी मेथी

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करावे. वाटाणे थोड टाकून मीठ टाकून शिजवून घ्यावेत

  2. 2

    पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यामध्ये जीरे तडतडले कि कांदा टोमॅटो आलं-लसूण काजू मगज बी थोडासं मीठ टाकून दहा मिनिटं झाकण लावून शिजवून घ्यावे. गार झाल्यानंतर त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यावी.

  3. 3

    एका मोठ्या कढईमध्ये थोड तेल आणि दोन चमचे बटर टाकून गरम करून तमालपत्र दालचिनी दोन वेलची टाकून ते तडतडले की त्यामध्ये धना पावडर, मिरची पावडर आणि काश्मिरी लाल मिरची पावडर टाकून ते थोडेसे दोन सेकंद परतून घ्यावे त्यामध्ये एक टिस्पून साखर टाकावी. त्यानंतर त्यामध्ये वाटलेली पेस्ट टाकून त्यावर झाकण ठेवून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  4. 4

    त्यामध्ये शिजवलेला वाटाणा गरम मसाला पावडर आणि किचन किंग मसाला पावडर हे टाकून ते निट मिक्स करून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये पनीर आणि वाटणाचे पाणी तसेच अर्धा ग्लास अजून पाणी त्यामध्ये टाकून ते परत एकदा नीट मिक्स करून त्यावर झाकण ठेवावे आणि पाच ते सात मिनिटं मटार पनीरची भाजी शिजवून घ्यावी. त्यानंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चोळून त्यामध्ये टाकावी आणि क्रीम ही त्यामध्ये टाकून नीट मिक्स करून घ्यावी तसेच चवीनुसार मीठही त्यामध्ये टाकावे.

  5. 5

    आपले मस्त खमंग घरगुती पद्धतीची मटार पनीर तयार आहे सर्वां बरोबर त्याचा आनंद घ्यावा😋🙏

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

Similar Recipes