पाकातील रवा लाडू (paakatil rawa ladoo recipes in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#रेसिपीबुक #week1
माझी आवडती रेसिपी 2
पाकातील रव्याचे लाडू ही रेसिपि अगदी योग्य प्रमाण आणि प्रत्येक स्टेप मध्ये टिप्स वापरून बनवलेले आहेत,नक्की करून पहा.

पाकातील रवा लाडू (paakatil rawa ladoo recipes in marathi)

#रेसिपीबुक #week1
माझी आवडती रेसिपी 2
पाकातील रव्याचे लाडू ही रेसिपि अगदी योग्य प्रमाण आणि प्रत्येक स्टेप मध्ये टिप्स वापरून बनवलेले आहेत,नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनिट
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 500ग्रॅम बारीक रवा
  2. 250 ग्रॅमसाजूक तूप
  3. 400 ग्रॅमसाखर
  4. 350 मिली पाणी
  5. 1 टेबलस्पूनवेलदोडे जायफळ पूड
  6. 1 टीस्पूनदूध
  7. 1 टेबलस्पूनमनुके सजावटी साठी

कुकिंग सूचना

30-35 मिनिट
  1. 1

    प्रथम रवा घ्या आणि तो आधी थोडा गुलाबी भाजून घ्या. टीप - रवा आधी नुसताच भाजून घेतल्याने तूप मध्ये छान भाजला जातो आणि तूप कमी लागते.इथे मी आधी भाजूनच घेतलेला रवा वापरला आहे. एका कढई मध्ये तूप घेऊन रवा मोजून. घ्या, तूप तापले कि मगच रवा टाकायचा आहे.1 ग्लास =250ग्रॅम प्रमाण आहे

  2. 2

    आधीच भाजलेला असल्यामुळे रवा साधारण 15-20 मिनिट छान भाजायचा आहे. टीप : प्रथम low flame वर आणि shewati मध्यम flame वर भाजायचा आहे. छान त्याला तूप सुटू लागते आणि त्याच texture बदलते.

  3. 3

    रवा आता एका ताटात काढा आणि पाक करण्यासाठी त्याच कढई मध्ये साखर घ्या, आणि पाणी टाका टीप :ज्या glass ने रवा घेतला त्याच glass ने मोजून असे साखर आणि पाणी घ्या.

  4. 4

    मध्यम फ्लेम वर पाक उकळत राहुदेत, मध्ये मधे ढवळणे चांगली उकळी आली कि त्यात थोडेसे दूध घालायचे टीप :से केल्याने साखरेची मळी बाजूला येते आणि ती काढून टाकायची

  5. 5

    टीप :अश्या प्रकारे मळी काढली कि स्वच्छ पाक तयार होती आणि लाडू कल्पतरू दिसत नाहीत, आता यात वेलदोडे जायफळ पूड घालायची आहे.

  6. 6

    उकळी आली कि पाक एकतारी झाला कि नाही check करून घ्यायचा. टीप :बोटांनी एक तर बघा किंवा उलथन्याने, तर आली पाहिजे, आणि असेल तर गॅस लगेच बंद करायचा.

  7. 7

    आता लगेचच भाजलेला रवा या पाकात घालायचा आणि झाकून ठेवायचा, 5-6 तास मुरवत ठेवून लाडू बांधा छान वळले जातात. लाडू बांधताना ड्रायफ्रुटस मनुके वापरू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
Khup masta nakkich karen mi karan pak karaycha kadhi prayatna kela nahi kela mi

Similar Recipes