बीट आणि मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

घरच्यांसाठी काहीतर पौष्टिक अशी साधी सोपी रेसिपी आहे. गोल्डन अप्रोन मधे यावेळी मोड आलेलं कडधान्य होत म्हणून ही रेसिपी तयार केली.
#कोशिंबीर
#goldenapron3
#week4

बीट आणि मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर

घरच्यांसाठी काहीतर पौष्टिक अशी साधी सोपी रेसिपी आहे. गोल्डन अप्रोन मधे यावेळी मोड आलेलं कडधान्य होत म्हणून ही रेसिपी तयार केली.
#कोशिंबीर
#goldenapron3
#week4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२-३ व्यक्ती
  1. १ वाटी मूग
  2. १ मोठ बीट
  3. थोडीशी कोथिंबीर
  4. १ चमचा तूप फोडणीसाठी
  5. १/२ छोटा चमचा जिर
  6. हिंग चिमुटभर
  7. मीठ चवप्रमाणे
  8. साखर चवीप्रमाणे
  9. १/२ लिंबाचा रस
  10. १/४ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट
  11. १/२ छोटा चमचा लाल तिखट
  12. सुक्या हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम १ वाटी मूग रात्रभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी चाळणी मधे उसपून त्याला मोड येऊ द्यावे

  2. 2

    नंतर १ बीट साल सोलून किसून घ्यावे. नंतर सगळं साहित्य एकत्र करावे. नंतर एका बाउल मधे मोड आलेले मूग, किसलेल बीट, बारीक चिरून कोथंबीर, साखर मीठ चवप्रमाणे घालावे. त्यामध्येच लाल तिखट घालावे व लिंबू पिळावे.

  3. 3

    नंतर १ छोट्या भांड्यामधे फोडणी साठी तूप गरम करावे. त्यात हिंग, सुक्या लाल मिरच्या व जिर घालावे. ही फोडणी वरील मूग व बीट च्य मिश्रणात घालून एकत्र करावं.

  4. 4

    तुमची कोशिंबीर खायला तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes