पडवळाची कोशिंबीर

#फोटोग्राफी
#कोशिंबीर
कच्च्या पडवळाची कोशिंबीर फार चविष्ट लागते. बरेच जण पडवळ खात नाहीत. पण ही रेसिपी वापरून कोशिंबीर केली की कळतही नाही यात कच्चे पडवळ आहे ते. रेसिपी आपल्या खमंग काकडी सारखी आहे. पण चव मात्र वेगळी आणि मस्त असते. माझ्या मुलाला पडवळ आवडत नाही. पण ही कोशिंबीर मात्र अगदी आवडीने खातो - भाजीऐवजी.
पडवळाची कोशिंबीर
#फोटोग्राफी
#कोशिंबीर
कच्च्या पडवळाची कोशिंबीर फार चविष्ट लागते. बरेच जण पडवळ खात नाहीत. पण ही रेसिपी वापरून कोशिंबीर केली की कळतही नाही यात कच्चे पडवळ आहे ते. रेसिपी आपल्या खमंग काकडी सारखी आहे. पण चव मात्र वेगळी आणि मस्त असते. माझ्या मुलाला पडवळ आवडत नाही. पण ही कोशिंबीर मात्र अगदी आवडीने खातो - भाजीऐवजी.
कुकिंग सूचना
- 1
पडवळ धुवून बिया काढून बारीक किसणीने किसून घ्यावे.
- 2
पाणी सुटेल ते काढून कीस थोडा पिळून घ्यावा.
- 3
कीस एका वाडग्यात घेऊन त्यात शेंगदाण्याचे कूट, मिरच्यांचा ठेचा, साखर, मीठ, नारळ, चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घालून एकत्र करावे.
- 4
छोट्या कढईत साजूक तूप गरम करून जिरे व हिंग घालून फोडणी करावी. ही फोडणी पडवळाच्या वाडग्यात घालून एकत्र करावे.
- 5
चविष्ट पडवळ कोशिंबीर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नवलकोलची (अल्कोल/ Kohlrabi / Gathgobi) कोशिंबीर
#कोशिंबीरनवलकोल / अल्कोल जास्त खाल्ला जात नाही. तो चवीला थोडासा कोबीसारखा असतो. पण कोबीसारखा सुका नसतो. मी नेहमी नवलकोल ची कोशिंबीर बनवते. छान होते. कच्च्या नवलकोल मध्ये मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं. म्हणून कोशिंबीर करताना मीठ आणि साखर वाढायच्या वेळी मिक्स करा. Sudha Kunkalienkar -
रुचकर खमंग काकडी - कोशिंबीर
जेवणाच्या ताटा मध्ये ही डावी बाजू म्हणून आवर्जून लागतेच. ह्यात पण बरेच प्रकार आहेत..ही कोशिंबीर उपवास असो की नैवेद्याचे ताट किंवा रोजचे जेवण, ही कोशिंबीर खूप छान लागते. आजारी लोकांनच्या पण तोंडाला चव आणते.मी यात कोथिंबीर घातली आहे, बरेच जण कोथिंबीर उपवासाला खात नाहीत. आपल्या चवी प्रमाणे कोथिंबीर चा वापर करावा, नाही घातली तरी तशी पण छानच लागते.चला तर म ही रेसिपी बघूया ..... Sampada Shrungarpure -
मेथीची कोशिंबीर - हिवाळा स्पेशल - चविष्ट आणि पौष्टिक कोशिंबीर
#विंटरही मेथीच्या कच्च्या पानांची कोशिंबीर आहे. आश्चर्य वाटतंय? अजिबात कडू लागत नाही. खूप चविष्ट लागते. अगदी पटकन होणारी ही पौष्टिक कोशिंबीर नक्की करून बघा. आता हिवाळ्यात छान ताजी मेथी मिळायला लागलीय. छोट्या पानांची गावठी मेथी मिळाली तर ती जास्त छान लागते. मात्र मेथी कापण्याआधी स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या. Sudha Kunkalienkar -
घोसाळ्याचे (Sponge Gourd) भरीत / गिलकी चं रायतं
#कोशिंबीरघोसाळं मला फार आवडतं. मला वाटत होतं घोसाळ्याचे भरीत छान होईल. एक - दोन रेसिपीज पहिल्या पण आवडल्या नाहीत. म्हणून स्वतः च रेसिपी बनवली. घोसाळ्याला खूप पाणी सुटतं. म्हणून भरीत करायच्या आधी ते पाणी सुकवलं तर चांगलं होईल असं वाटलं. आणि घोसाळ्याला लसणीचा वास छान लागतो. मग चरचरीत लसणीची फोडणी दिली शेवटी. मस्त टेस्टी झाले भरीत. Sudha Kunkalienkar -
-
पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
# पडवळ ही भाजी बरेच जण खात नाहीत. माझ्या माहेरी पण ही भाजी खात नाहीत. लग्न झाल्यावर ही भाजी मला सासूबाईंनी शिकवली. आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी वाल घालून, कधी बेसन पेरून तर कधी चणाडाळ घालून. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
पडवळ भाजी (prawal bhaji recipe in marathi)
#GA4#week26#POINTED GOURDगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये POINTED GOURD (parwal) हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली.पडवळ ही भाजी तितकी आवडीची नाही. पण तिच्या आरोग्याला फायदे बघितले तर भरपूर आहेत.पडवळ मध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस तंतुमय व पिष्टमय पदार्थ भरपूर आहे. बर्याच आजारांवर पडवळ खूप उपयोगी आहे म्हणून कितीही नावडती असली तरी आहारातून घेतलीच पाहिजे. थोडी काकडी सारखी दिसणारी थोडी तोडली सारखी दिसणारी ही भाजी तिची स्वतःची चव दिसण्यापेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळी आहेमाझ्याकडे की भाजी इतक्या आवडीने खात नाही मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी एकही वस्तू आवडत नाही असे सांगत नाही कारण लहानपणापासून माझ्यात तसे टाकलेच आहे की काही आवडत नाही असं आहेच नाही कोणतीही वस्तू चाखून, टेस्ट करून बघितली पाहिजेअसे मला नेहमी शिकवलेले आहे त्यामुळे मी नवीन नवीन वस्तू बनवून आणि टेस्ट करून बघतेस.माझी एक फ्रेंड आहे तीही भाजी बनवते तेव्हा ती मला देते त्यात ती तूप करतानाचे शेवटचे कडलेले शेवटचे वेस्ट उरते ते ती या भाजीत टाकते खरच ते टाकल्यामुळे चव खूप छान लागते मी ही भाजी आजी बनवते त्या पद्धतीने तयार केली आहे.बघूया रेसिपी पडवळ कशी तयार केली Chetana Bhojak -
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
कडवे वाल पडवळ भाजी (kadve val padval bhaji recipe in marathi)
#ॠतू नुसार भाजी# ह्या ॠतू पडवळ भरपूर पिकते पचायला एकदम हलके पण खुप जण खात नाहीत म्हणून ही मिश्र भाजी केली जाते .अर्थात छान लागते . Hema Wane -
बीट आणि मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर
घरच्यांसाठी काहीतर पौष्टिक अशी साधी सोपी रेसिपी आहे. गोल्डन अप्रोन मधे यावेळी मोड आलेलं कडधान्य होत म्हणून ही रेसिपी तयार केली.#कोशिंबीर#goldenapron3 #week4 GayatRee Sathe Wadibhasme -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'बनाना ' हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज थोडी वेगळी केळीची कोशिंबीर रेसिपी पोस्ट करत आहे. झटपट होणारी अशी ही कोशिंबीर उपवासाला पण चालते. गौरी च्या जेवणामध्ये ज्या 5 कोशिंबीर असतात त्या मध्ये ही एक कोशिंबीर केली जाते. Rupali Atre - deshpande -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
काकडी म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील एक तोंडी लावणे प्रकारातील खाद्यपदार्थ! काकडीचे विविध गुणधर्म म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं.त्यात विविध व्हिटॅमिन्स असतात, जसे की व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, तसंच मॅंगनीज, पोटॅशियम बीटा कॅरोटीन इत्यादी घटकही असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.कधी नुसती खाण्यासाठी, कधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून खाण्यासाठी आपण काकडी वापरतो. आपण काकडी खावी म्हणून लहानपणी आई आपल्याला धाक दाखवूनही काकडी खाऊ घालते.कधी कधी मुलं काकडी खात नाहीत म्हणून विविध पदार्थात त्याचा वापर करून छुप्या पद्धतीने मुलांना काकडी खाऊ घालतात..😊काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.चला तर पाहूयात खमंग काकडी...😊 Deepti Padiyar -
मूगडाळ आणि काकडीची कोशिंबीर
कोशिंबिरी म्हणजेच सॅलड चे भारतीय थाळीत अतिशय महत्त्वाचे स्थान ! दह्यासोबत किंवा दह्याशिवाय बनलेल्या , कच्च्या फळ भाज्या आणि फळांपासून बनलेल्या या कोशिंबिरी पचनक्रिया सोप्पी होण्यासाठी आवश्यक असलेले फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थांचा पुरवठा करतात . कर्नाटकातली प्रसिद्ध काकडी आणि मूग डाळीची कोशिंबीर! Smita Mayekar Singh -
फंटू कोशिंबीर
#फोटोग्राफी यामध्ये फरसबी टोमॅटो आणि बटाटा असे घटक वापरून ही केली आहे म्हणून पण तो कोशिंबीर असे ह्याला संबोधले आहे. हेसुद्धा कोशिंबीर खऱ्या मी तिला ते जरुर ट्राय करा पाहूया पण तू कोशिंबीर ची रेसिपी. Sanhita Kand -
पेरूची कोशिंबीर
#कोशिंबीरजेवणात भाजी, चपाती, भात याबरोबरच कोशिंबीर, लोणचे, पापड, चटणी असेल तरच ते ताट परिपूर्ण वाटते. मग ते नैवेद्यासाठी ताट असेना का....आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बिट यांच्या कोशिंबीरी बनवतोच, पण आज मी एक आगळीवेगळी पेरूची कोशिंबीर दाखवणार आहे, बघा करून, तुम्हाला आवडते का ते..... Deepa Gad -
रुचकर खमंग काकडी (ruchkar kakadi recipe in marathi)
#shr#week3#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज"रुचकर खमंग काकडी" आषाढ सरींनी विश्रांती घेतली आणि सूर्यदेवांच्या उपस्थितीत श्रावणाचे पुण्यात आगमन झाले. श्रावण म्हणजे हिंदू धर्मातला सर्वाधिक सण आणि व्रतवैकल्यांनी खचाखच भरलेला महिना. नागपंचमी, गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधन असे सण. मंगळागौर, श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार आणि अशी अनेक व्रतवैकल्ये आणि उपवास. उपवास म्हटला, की मग फराळाचे पदार्थ ओघाने आलेच. अर्थात, फराळाच्या पदार्थांसाठी उपास असलाच पाहिजे असं काही बंधन नाही.... साबुदाणा वडा, दाण्याची आमटी, बटाट्याची भाजी,रताळ्याचा किस, आणि खमंग काकडी.... खमंग काकडी, एक असा पदार्थ, जो मी अगदी कधीही खाऊ शकते, फारच रुचकर आणि उपवासाला ही चालत असल्यामुळे माझा आणि सर्वांचाच आवडता पदार्थ.....👌👌चला तर मग पटकन रेसिपी बघुया.... Shital Siddhesh Raut -
गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी हेल्दी अशी ही कोशिंबीर आहे Charusheela Prabhu -
पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
#GA4#week24#keyword_snakegourdपडवळाची भाजी चणाडाळ घालून केली छान लागते. मुद्दाम मी या भाजीत चणाडाळ जास्त टाकते, म्हणजे माझी मुलगी पण ही भाजी आवडीने खाते. Shilpa Ravindra Kulkarni -
कारल्याची कोशिंबीर
#फोटोग्राफीकारले कडू म्हणून खायला नाकारणारी सुध्या ही कोशिंबीर आवडीने खातात Prachi Manerikar -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
-
लसूण भेंडी (lasun bhendi recipe in marathi)
बरेच जण भेंडीची भाजी चिकट होते म्हणून खात नाहीत. पण या पद्धतीने करुन पहा. तुम्हाला नक्की आवडेल.मी या भाजीला कांदा घालत नाही. Archana bangare -
साबुदाणा खिचडी
ही खिचडी सगळेजण आपण नेहमी घरी बनवतो आणि खात असतो. पण ह्या खिचडीचे वैशिष्ट्य असे आहे ती रंगाने पांढरी दिसते माऊ लुसलुशीत पण आहे. ती कशी हे पाहूया. Sanhita Kand -
-
कोबीची कोशिंबीर (Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKथोडीशी वेगळी पण चवीला छान असणारी ही कोबीची कोशिंबीर सगळ्यांना खूपच आवडेल Charusheela Prabhu -
पडवळाच रायतं (padwlach raita recipe in marathi)
वेली भाजीचा एक प्रकार म्हणजे पडवळ. गौरीच्या प्रसादात आमच्याकडे पडवळ घालून कढि आणि पडवळाची कथली असते. जरा वेगळी पडवळाच रायतं ही रेसिपी ट्राय केली. Deepali dake Kulkarni -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
पडवळाची भजी (padvlachi bhaji recipe in marathi)
#gurगोड गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला की तिखट बनवावेसे वाटते मग सहज आणि झटपट बननारी ही पडवळाची वेगळी भजी बनवूयात. Supriya Devkar -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या