डाळ -कैरी
कुकिंग सूचना
- 1
हरभरा डाळ 2 तास भिजत ठेवणे. डाळ भिजल्यावर ती निथळून घेणे.
- 2
मिक्सर च्या जार मधे हरभरा डाळ, हिरवी मिरची 3,4 कढीपत्त्याची पाने टाकून ओबड ढोबड वाटून घेणे
- 3
एक बाउल मधे वाटलेली डाळ टाकून त्यामधे मीठ, साखर, किसलेली कैरी, टाकून मिक्स करून घेणे आणि मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करून चांगलं मिक्स करून,बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
आंबे डाळ / कैरीची डाळ (kairi dal recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात चैत्र महिन्यातील हळदी कुंकाला हमखास केली जाणारी आंबे डाळ किंवा कैरीची डाळ.कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. ‘सी’ व ‘के’ जीवनसत्त्वेही कैरीत आहेत. ‘सी’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.हरभरा डाळ ही बल प्रदान करणारी डाळ आहे. प्रथिने, ब- जीवनसत्व व अनेक क्षारांनी हरभरा डाळ परिपूर्ण आहे. Rajashri Deodhar -
-
-
कैरी डाळ
#पहिलीरेसीपीकैरी डाळ हा महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. कैरी व डाळीचं हे मिश्रण अतिशय चविष्ट आहे. ही कैरी डाळ खासकरून चैत्र महिन्यात, हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या वेळी बनविली जाते. ह्या बरोबर कैरी पन्हे द्यायची रीत आहे. Pooja M. Pandit -
-
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
माझ्या आवडता पदार्थ. माझ्या माहेरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी डाळ कैरी आणि पन्ह हे दिले जाते. Suvarna Potdar -
कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#KRRखास चैत्रात केला जाणारा,चैत्रगौरीसाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीची डाळ.हरभऱ्यात मुळातच पोषणमूल्य भरपूर असतात.चैत्रगौरीसाठी हरभऱ्याची उसळ केली जाते,त्याबरोबरच ही आंबट,तिखट,गोडसर अशा चवीची डाळ....आंबेडाळ किंवा कैरीची डाळ हमखास केली जाते.उन्हाची काहिली चैत्रमासात खूप त्रासदायक असते.इकडे अन्नपूर्णा गौर चैत्रात माहेरपणासाठी येते असे मानले जाते.तिला तांदळाच्या राशीवर चांदीच्या वाटीमध्ये झुल्यावर बसवून तिला दागिने घालून आरास केली जाते.चैत्र शु.तृतीया ते अक्षय्यतृतिया अशी ही माहेरवाशीण चांगली महिनाभर मुक्काम करते.मग तिच्यासाठी रोज मोगऱ्याचा मन सुगंधी करणारा गजरा,कधी मादक सुवासाचा सोनचाफा अर्पण केला जातो.इतके गोड दृष्य असते चैत्रगौरीचे.अगदी मनात साठवुन ठेवावे असे!पाडव्याची गुढीची गाठी घालून झुला सजवला जातो.रोज काहीतरी गौरीसाठी गोड साखरांबा,गुळांबा,श्रीखंड,आम्रखंड, कैरीचं पन्हं, खीर,पुरणपोळी,आमरस अशी रेलचेल असते.चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी मग माहेरून बोळवण करताना कानवले,बेसनाचे लाडू,कलिंगड, खरबूज तसंच कैरीची डाळ,पन्हं अर्पण केले जाते.मैत्रिणींसमवेत अत्तर,गुलाबपाणी यांची उधळण करत वातावरणात मंद सुवास,थंडावा निर्माण केला जातो.मनमोहक टपोरे मोगऱ्याचे गजरे तर यावेळी हवेतच!!एकूण काय,आपल्या पूर्वजांनी उन्हाळा सुसह्य व्हावा,सर्वांनी एकत्र जमावे,थोडी मौज करावी,सुखदुःख वाटावी या करताच हे निमित्त योजलेले असावे.आता काळाच्या ओघात व धावपळीच्या जीवनात एक दिवस देवाच्या निमित्ताने तरी एक उर्जा देणारा असा गाठीभेटीचा,हळदीकुंकवाचा कार्यक्रम नक्कीच सुखावह ठरु शकतो🤗या मग मैत्रिणींनो चैत्रगौरीचं हळदीकुंकू घ्यायला.सोबत डाळ,पन्हं घ्यायला😊🤗♥️🙏🙏 Sushama Y. Kulkarni -
-
-
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#आंबेडाळ#rawmango#कैरीडाळमहाराष्ट्राची फेमस अशी साईड डिश म्हणून ताटात वाढली जाणारी आंबेडाळ सर्वत्रच उन्हाळ्यात आवर्जून खाल्ली जाते .उन्हाळ्याची खास अशीही रेसिपी तसेच चैत्राची चाहूल लागताच अशा प्रकारचे पदार्थच आवडायला लागतातचैत्र नवरात्रात गौरीला हळदीकुंकवाच्या डाव्या साईडला पानावर वाढला जाणारा पदार्थ म्हणजे आंबेडाळ छान आंबट-गोड चविष्ट असा पदार्थउन्हाळ्यात असे पदार्थ जेवणातून छान लागतात बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या मिळत आहे आहे मग अशा प्रकारचे पदार्थ बनवून खाल्ले तर अजून जेवणाला रंगत येते. उन्हाळात पोळी भाजी असे पदार्थ जरा कमी आवडतात मग डाव्या साईडचे पदार्थ उन्हाळ्यात जास्त आवडू लागतात मग तो मेथांबा, लोणचे, कोशिंबीर, दही, ताक ,चटण्या हे जेवणाची रंगत वाढवतात मग जेवणही आवडू लागते. हा पदार्थ पौष्टिकही आहे .आंबेडाळ साईड डिश म्हणून ताटात सर्व केली जाते. पूर्ण जेवणाची चव हे आंबेडाळ वाढवते'उन्हाळ्यात जेवणाची रंगत वाढूया आंबेडाळ वाटूया'मग या उन्हाळ्यात नक्कीच आंबेडाळ बनवून बघा आणि खाऊनही बघा खूपच छान चविष्ट असा पदार्थ आहे Chetana Bhojak -
कैरी डाळ
#Goldenapron3 Week14 या कोड्यात असणाऱ्या चणा या घटकाचा म्हणजे चणाडाळ त्याचा वापर करूनच ही कैरी हा पदार्थ बनवला आहे .उन्हाळा आणि चित्र म्हटलं की कैरी डाळ किंवा आंबाडाळ ही सगळ्यांच्या घरात बनतेच बनते आणि सगळ्यांचा फेवरेट आवडता पदार्थ आहे. अतिशय झटपट आणि हेल्दी अशी ही डिश आहे बघूया कशी बनवायची रेसिपी. Sanhita Kand -
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji -
-
-
आंबे डाळ (कैरी डाळ) (ambe daal recipe in marathi)
#amr#आंबे डाळचैत्र महिना लागला की चैत्र गौरी ची चाहूल लागते अक्षय तृतीया पर्यंत हे हळदी कुंकू केल्या जाते. घरो घरी सुंदर आरास करून त्यात गौर बसवली जाते....यात आंबे डाळ (कैरी डाळ) पन्हं आणि हरभरा...साखर खोबऱ्याचा नैवेद्य असतो.....आज खास सगळ्या साठी आंबे डाळीची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
-
कैरी डाळ (वाटली डाळ) (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17Mango ..raw mango Bharti R Sonawane -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#treding चैत्र महिना आला की हळदी कुंकू सुरु होतात . खेळ, गप्पा, चेष्टा, मस्करी यांना ऊत येतो. हसण्या खिदळण्याचा खळखळाट संपला की मग अल्पोपहार. आंबे डाळ आणि थंडगार पन्हे. आम्हा महिलांना ती मेजवानीच असते. ह्या वर्षी जरी हळदी कुंकू करोना मुळे नसले तरी आंबे डाळ आणि पन्हे आपण केल्याशिवाय राहणारच नाही. चला तर पहा मी कशी करते आंबे डाळ. ही आंबे डाळ माझ्या मिस्टरांना खूप आवडते. त्यांच्या साठी मी ही आंबे डाळ करतेच. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12088056
टिप्पण्या