कुकिंग सूचना
- 1
कढईमध्ये तेल टाकुन त्यात मोहरी टाका.मोहरी तडतडल्यावर त्यात कांदा टाकून परतून घ्या.आता त्यात कढीपत्ता, हळद,मिरची पावडर आणि टोमॅटो टाकून एक मिनिट परतून घ्यावे.नंतर त्यात मटकी टाकुन हलवून घ्या. नंतर त्यात मिठ टाका आणि १ कप पाणी टाका आणि झाकण बंद करून पाच मिनिटे शिजवून घ्या. आता वरून कोथिंबीर टाका. तयार आहे आपली सुकी मटकी.
- 2
शेवग्याच्या शेंगा मीठ टाकुन शिजवून घ्या. आता कुकर मध्ये २-२ चमचे प्रमाणे तूर डाळ,मूग डाळ, मसूर डाळ,आणि चणाडाळ घ्या. त्यात मीठ,हळद,लाल मिरची पावडर, दोन टोमॅटो,कोथिंबीर आणि पाणी टाकून चांगली शिजवून घ्या.
- 3
कढईत एक चमचा तेल टाका त्यात लसूण,मोहरी, जिरे,कढीपत्ता, टाका तडतडल्यावर त्यात शिजलेली डाळ आणि शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून हलवून घ्या.आपल्याला आवश्यकतेनुसार त्यात पाणी टाका.चांगली उकळी आल्यावर वरून कोथिंबीर टाका आणि थोडेसे कसुरी मेथी टाकून हलवून घ्या.तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगा घालून तयार केलेली डाळ. हे खायला खूप टेस्टी लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
More Recipes
टिप्पण्या