डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ 5-6 तास भिजत ठेवा. जीरे भाजून घ्या. कैरी चे सालं काढून कैरी चिरून घ्या.
- 2
डाळ छान भिजली कि एका मिक्सर च्या भांड्यात जीरे बारीक करा, त्यात मिरची, आलं, थोडा कढीपत्ता, चिरलेली कैरी भिजलेली डाळ, थोडी कोथिंबीर घाला. थोडं मीठ, साखर घाला आणि लागेल तस थोडे पाणी घालून एकजीव वाटून घ्या.
- 3
वाटलेली डाळ कैरी एका वाटी मध्ये काढून घ्या. तडका पॅन मध्ये थोडे तेल, जीरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हळद घालून तडका डाळ कैरी घाला. मस्त डाळ कैरी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
माझ्या आवडता पदार्थ. माझ्या माहेरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी डाळ कैरी आणि पन्ह हे दिले जाते. Suvarna Potdar -
-
-
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपीसध्या उन्हाळा सुरु झालाय आणि कैरीच नाव जरी काढलंतरी तोंडाला पाणी सुटतंय....म्हणुन ही खास आंबट गोड डाळ कैरी...... Supriya Thengadi -
कैरी डाळ (वाटली डाळ) (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17Mango ..raw mango Bharti R Sonawane -
-
आंबे डाळ (कैरी डाळ) (ambe daal recipe in marathi)
#amr#आंबे डाळचैत्र महिना लागला की चैत्र गौरी ची चाहूल लागते अक्षय तृतीया पर्यंत हे हळदी कुंकू केल्या जाते. घरो घरी सुंदर आरास करून त्यात गौर बसवली जाते....यात आंबे डाळ (कैरी डाळ) पन्हं आणि हरभरा...साखर खोबऱ्याचा नैवेद्य असतो.....आज खास सगळ्या साठी आंबे डाळीची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
कैरीची डाळ (kairichi daal recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#कैरीची डाळ Rupali Atre - deshpande -
आंबे डाळ / कैरीची डाळ (kairi dal recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात चैत्र महिन्यातील हळदी कुंकाला हमखास केली जाणारी आंबे डाळ किंवा कैरीची डाळ.कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. ‘सी’ व ‘के’ जीवनसत्त्वेही कैरीत आहेत. ‘सी’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.हरभरा डाळ ही बल प्रदान करणारी डाळ आहे. प्रथिने, ब- जीवनसत्व व अनेक क्षारांनी हरभरा डाळ परिपूर्ण आहे. Rajashri Deodhar -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#amr काल अक्षयत्रितीया निमित्त मी आंबे डाळ बनवली होती ,आंबे डाळ कच्चा आंबा कैरीचा सिझन चालू झाला की व चैत्राची चाहूल लागली की प्रत्येक ठिकाणी घरोघरी बनवली जाते. म्हणूनच मी आंबे डाळ कशी करायची ते इथे शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#आंबेडाळ#rawmango#कैरीडाळमहाराष्ट्राची फेमस अशी साईड डिश म्हणून ताटात वाढली जाणारी आंबेडाळ सर्वत्रच उन्हाळ्यात आवर्जून खाल्ली जाते .उन्हाळ्याची खास अशीही रेसिपी तसेच चैत्राची चाहूल लागताच अशा प्रकारचे पदार्थच आवडायला लागतातचैत्र नवरात्रात गौरीला हळदीकुंकवाच्या डाव्या साईडला पानावर वाढला जाणारा पदार्थ म्हणजे आंबेडाळ छान आंबट-गोड चविष्ट असा पदार्थउन्हाळ्यात असे पदार्थ जेवणातून छान लागतात बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या मिळत आहे आहे मग अशा प्रकारचे पदार्थ बनवून खाल्ले तर अजून जेवणाला रंगत येते. उन्हाळात पोळी भाजी असे पदार्थ जरा कमी आवडतात मग डाव्या साईडचे पदार्थ उन्हाळ्यात जास्त आवडू लागतात मग तो मेथांबा, लोणचे, कोशिंबीर, दही, ताक ,चटण्या हे जेवणाची रंगत वाढवतात मग जेवणही आवडू लागते. हा पदार्थ पौष्टिकही आहे .आंबेडाळ साईड डिश म्हणून ताटात सर्व केली जाते. पूर्ण जेवणाची चव हे आंबेडाळ वाढवते'उन्हाळ्यात जेवणाची रंगत वाढूया आंबेडाळ वाटूया'मग या उन्हाळ्यात नक्कीच आंबेडाळ बनवून बघा आणि खाऊनही बघा खूपच छान चविष्ट असा पदार्थ आहे Chetana Bhojak -
वाटली डाळ (विदर्भ स्टाईल) (vatli daal recipe in marathi)
# cooksnap # Supriya Thengadi ताईंची recepy cook snap केलेली आहे. खूपच छान चवदार झालेली आहे.Thank you Supriya Tai.. Priya Lekurwale -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#cooksnap#summer special आज मी वर्षा इंगोले बेले मॅडम ची "आंबा डाळ" ही रेसिपी cooksnap केलेली आहे. फारच चवीष्ट झालेली आहे. Priya Lekurwale -
-
-
कैरी डाळ
#पहिलीरेसीपीकैरी डाळ हा महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. कैरी व डाळीचं हे मिश्रण अतिशय चविष्ट आहे. ही कैरी डाळ खासकरून चैत्र महिन्यात, हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या वेळी बनविली जाते. ह्या बरोबर कैरी पन्हे द्यायची रीत आहे. Pooja M. Pandit -
वाटली डाळ (प्रेशर कुक) (vaatli daal recipe in marathi)
#PCR "वाटली डाळ" किंवा "मोकळं पिठलं/मोकळा झुणका" ही माझ्या आईची युनिक रेसिपी! कारण सर्वसाधारणपणे वाटली डाळ वाटून ती लगेचच फोडणीत ढकलली जाते. आई मला नेहमी सांगायची की अशा वाटल्या डाळीला तेल नेहमीपेक्षा जरा जास्तच लागतं. म्हणूनच, ती डाळ वाटून प्रेशर कुक करून नंतर कमी तेलात फोडणी करायची.. ती तशी पहिल्यापासूनच हेल्थ कॉन्शस होती. तेल किती घालावे, कुठल्या सिझनमध्ये कोणते तेल वापरावे हे सगळं तिच्याकडूनच ग्रहण केलं गेलं.. डॉक्टर, डाएटिशीयन मी नंतर झाले. पण, त्या विषयाचं बाळकडू लहानपणीच प्यायले होते बहुधा.. तसंच, आईची ही रेसिपी कांदा-लसूण विरहीत असल्याने टिकाऊ बनते आणि प्रवासात उपयोगी पडते. लहानपणी, हादग्याची खिरापत म्हणून मी दरवर्षी वाटली डाळच न्यायचे. कॉलेजमध्ये गेल्यावरही मला बरेचदा हॉस्टेलमध्ये जायला निघताना मोठ्ठा डबाभर वाटली डाळ मिळायची.. खूपच वेगळी आणि साधीसरळ प्रेशर कुकड् रेसिपी आहे.. नक्की सगळ्यांना आवडेल... शर्वरी पवार - भोसले -
अबोली डाळ कैरी (aboli dal kairi recipe in marathi)
#dr आपण नेहमी कांदा कैरी किंवा डाळ कैरी बनवत असतो परंतु मी येथे डाळीत लाल मिरच्या शेंगदाणे लसूण टाकून नाविन्यपूर्ण अबोली डाळ कैरी बनवली अत्यंत टेस्टी व झणझणीत लागते चला पाहुयात कशी बनवायची ते ..…. Mangal Shah -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव _रेसिपीज #आंबाडाळ.. परवा अक्षय्य तृतीया झाली..चैत्रगौरी सासरी परत जातात..महिनाभर माहेरपणाला आलेली ही गौर जाताना सुखद आठवणी घेऊन जाते..या माहेरवाशिणीचे आपण केलेले कोडकौतुक मनात साठवून आपल्या बरोबर घेऊन जाते..आपणही मोठ्या उत्साहात कोडकौतुक, हळदीकुंकू करतो आपल्या चैत्रगौरीचं..तिच्या आगमनाने खरंतर आपणच विसावलेले असतो,आनंदले असतो..मनाला सकारात्मकता लाभते आपल्या..किती खोलवर विचार केलाय आपल्या पूर्वजांनी या सगळ्या सणांचा.. आणि मग याच उत्साहात प्रत्येक जण जसं जमेल तसं विविध खाद्यपदार्थ करुन गौरीचे आणि पर्यायाने स्वतःचे लाड करुन घेतो. मी पण चैत्रगौरीसाठी चटपटीत आंबाडाळ केलीये..चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
कैरी डाळ (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#फॅमिली .... हो फॅमिली म्हंटले की घर आणि घरात राहणारे रक्ताची नाती.....त्यातल्या त्यात आई वडील म्हणजे आपला एक अविभाज्य घटक....आजची रेसिपी कैरी डाळ ही माझ्या फॅमिली साठी बनविली आहे त्यांना डेडीकेटेड आहे....👩🏻🍳💯👍🏼 Pallavii Bhosale -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#ट्रेंडिंग# आंबे डाळआंबेडाळ ही एक उन्हाळ्यातील पारंपारिक रेसिपी आहे.आंबेडाळ ही विशेष करून चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला करतात.आंबेडाळ म्हटलं की तोंडाला प्रचंड पाणी सुटतं 😋 आणि चव तर आंबट गोड तिखट अशी खूपच छान लागते 👌 Sapna Sawaji -
-
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
#MDRमदर्स डे निमित्य खास माझ्या आईचा आणि माझा आवडता आंबटगोड असा कैरी भात...., Supriya Thengadi -
-
आंबेडाळ (ambe daal recipe in marathi)
#trending recipe#aambedalमराठी माणसाच्या घराघरात आंबेडाळ आणि कैरीचे पन्ह हे केलं जातं. महाराष्ट्राची फेमस अशी डाव्या बाजूला म्हणून पानात वाढली जाणारी आंबेडाळ उन्हाळ्यात अगदी हमखास खाल्ली जाते. चैत्र नवरात्रात गौरीला हळदीकुंकवाच्या समारंभात केला जाणारा पदार्थ म्हणजे आंबेडाळ. छान आंबट-गोड चविष्ट असा पदार्थ. नक्की करून पहा. Shital Muranjan -
पुदिना+कैरी चटणी (pudina kairi chutney recipe in marathi)
#CN # रेसिपी 1. चटणी जेवणातील एक अविभाज्य घटक! जेवणात रंगत आणते ती चटणीच! आमच्या कडे तर चटणी ,मिरच्या शिवायचे जेवण म्हणजे जणू मिठाशिवायचे व्यंजन! आज एक सौम्य पण चटकदार चटणीची रेसिपी शेअर करीत आहे. Pragati Hakim -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#summer special # उन्हाळ्यात जेवणात थोडे आंबट गोड असेल तर जेवण चांगले होते. म्हणून मग कच्च्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ केल्या जातात. मी ही आज अशीच आंबा डाळ केली आहे.. बघू या.. Varsha Ingole Bele -
कैरी कांदा चटणी (kairi kanda chutney recipe in marathi)
#KS5#ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे .उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असते .तेव्हा आपल्या स्वयंपाकात त्यात उतारा म्हणून बर्याच रेसिपी करतात .त्यातलीच ही एक चटणी रूचकर तर आहेच नि कांदा कैरीमुळे आरोग्यास ही हितकारक.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15023039
टिप्पण्या