झणझणीत कटवडा

Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803

#Lockdown day 21

झणझणीत कटवडा

#Lockdown day 21

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामबेसन
  2. 4मध्यम आकाराचे कांदे
  3. 7लसूण पाकळ्या
  4. 1/2 इंचआल
  5. 2मध्यम आकाराचे टोमॅटो
  6. 3 चमचेलाल तिखट
  7. 1 चमचाहळद
  8. कोथिंबीर
  9. 1 चमचागरम मसाला
  10. चवीनुसारमीठ
  11. राई जिरे फोडणीला
  12. 5मध्यम आकाराचे बटाटे
  13. 4ते 5 कढीपत्ता पानं
  14. 3 ते 4 हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

  1. 1

    आता आपण कटाची तयार करु.कांदा, लसूण, आलं छान भाजुन घेऊन कोथिंबीर घालून त्याचे वाटण करून घेऊ. दुसरीकडे 5 बटाटे शिजवून घेऊन कढईत तेल घालून राई जिर्याची फोडणी देऊन कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून बटाटे हळद आणि चवीनुसार मिठ घेऊन चांगले परतून घेतला. वरून थोडी कोथिंबीर घेतली.

  2. 2

    त्यानंतर एक कढईत तेल घेऊन राई जिर्याची फोडणी घालून बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगले परतून घेऊ.

  3. 3

    त्यानंतर त्यात वाटण घालून चांगले तेल सुटे पर्यंत परतून घेतले व त्यात लाल तिखट, गरम मसाला, हळद, मिठ घालून 5 मि. परतून घेऊन त्यावर झाकण ठेवून 2 मि. शिजवून घेऊन त्यात गरम पाणी घालू. गरम.पाण्याणी चांगले कट येतो.

  4. 4

    त्या नंतर 5 मि.उकळून घेऊ आणि आपला कट तयार.

  5. 5

    आता वड्याची तयार करून त्यासाठी एक बाऊल मध्ये बेसन घेऊन त्यात 1चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा घालून घेऊन व जे आपण बटाटा स्टफिंग बनवले आहे ते बेसन मध्ये बुडवून गरम तेलात वडे तळून घेऊन.

  6. 6

    आता आपले वडे तयार.आणि खाण्यासाठी तयार आहे कटवडा सोबत बारीक शेव,लिंबू, कांदा आणि ब्रेड 😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes