पकोडा / भजी प्लॅटर

Manisha Khatavkar
Manisha Khatavkar @cook_manik
Goa India

पकोडा / भजी प्लॅटर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि
  1. 2 वाटीहरभरा पीठ (बेसन)
  2. 1 टीस्पूनओवा
  3. 1 चमचामिरची पावडर
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1-2 चिमूटभरहिंग
  6. १/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 1मोठा कांदा पातळ कापला
  8. 1बटाटा बारीक कापला
  9. ५-6 हिरव्या मिरच्या खासकरुन पकोड्यांसाठी वापरल्या जातात त्या
  10. आवश्यकतेनुसार मीठ

कुकिंग सूचना

१५ मि
  1. 1

    सर्वात प्रथम कांदा भजी त्यासाठी डाळीच्या पिठात तिखट, ओवा, मीठ व हळद घाला.
    कांदे उभे पातळ चिरावेत. चिरलेला कांदा, कोथिंबीर पिठात घालावे.

  2. 2

    भज्याचे पीठ भिजवावे. पीठ फार घट्ट भिजवू नये.

  3. 3

    भजी तळताना पिठात दोन मोठे चमचे कडकडीत तेल घालावे. नंतर तेलात भजी तळून काढावीत. कांदा भजी सर्व्ह करायला तयार आहे

  4. 4

    बटाटा आणि मिरची भजीसाठी पिठ.पिठात हळद तिखट मीठ ओवा घालावे.भज्याचे पीठ भिजवावे. पीठ फार सैल भिजवू नये.डाळीच्या

  5. 5

    बटाट्याचे पातळ काप करावेत. या कापांना थोडे मीठ लावून ठेवावे.

  6. 6

    या पिठात बटाट्याचे काप बुडवून भजी बदामी रंगावर तळावीत.

  7. 7

    जादा तेल काढण्यासाठी कागदाच्या टॉवेलवर पकोडे काढून टाका.

    सर्व्ह करण्यास तयार.

  8. 8

    मिरची पकोडासाठी हिरवी मिरची एका बाजूला वरून चिरून मिरची पासून बिया काढून टाका. मिरची फुटू नये नये याची काळजी घ्यावी.

  9. 9

    एक एक मिरची पिठात बुडवून गरम तेलात सोडावी व गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळावी.

  10. 10

    ब्रेडबरोबर किंवा साईड डिश म्हणून सर्व्ह करण्यासाठी तयार मिर्ची पकोडे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Khatavkar
Manisha Khatavkar @cook_manik
रोजी
Goa India
I'm not a chef. But I'm passionate about food - the tradition of it, cooking it, and sharing it.https://www.facebook.com/groups/294556424409443/
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes