पौष्टिक दाल खिचडी

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिश
कोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे.

पौष्टिक दाल खिचडी

#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिश
कोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीतांदूळ
  2. अर्धी वाटी मिक्स डाळ(मुगडाळ,मसुरडाळ, तूरडाळ)
  3. 1कांदा(बारीक चिरलेला)
  4. 1टोमॅटो(बारीक चिरलेला)
  5. 4 ते 5 लसूण पाकळ्या(उभ्या चिरलेल्या)
  6. 2तमालपत्र
  7. 4 ते 5 काळीमिरी दाणे
  8. 1 छोटादालचिनी तुकडा
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  11. 1 टीस्पूनजिरे
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. 1 टीस्पूनहिंग
  14. 2लाल सुक्या मिरच्या
  15. 1हिरवी मिरची
  16. कडीपत्ता पाने
  17. कोथिंबीर बारीक चिरलेली

कुकिंग सूचना

  1. 1

    पाण्याने डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.

  2. 2

    डाळ तांदूळ आहेत त्याच्या अडीचपट पाणी कुकरला घाला.हिंग, हळद, तमालपत्र, दालचिनी, कालिमिरी, मीठ,हिरवी मिरची घाला.मध्यम आचेवर शिजवत ठेवा.

  3. 3

    आता गॅसवर एक कढई किंवा पॅन गरम करत ठेवा.पॅन मध्ये 2 चमचे तूप घाला.

  4. 4

    तूप गरम झालं की मोहरी व जिर टाका. मोहरी जिर तडतडल की बारीक चिरलेला कांदा घाला.

  5. 5

    कांदा हलका सोनेरी रंगावर परतवून घ्या.आता बारीक चिरलेला टोमॅटो घाला.कोथिंबीर मिक्स करा.मीठ डाळ तांदूळ शिजवताना घातलेलं आहे त्यामुळे जरा बेतानेच घाला.

  6. 6

    कुकर उघडा. डाळ तांदूळ ला चमचा फिरवून घ्या.टोमॅटो कांद्यावर टाकून चांगले मिक्स करा.

  7. 7

    आता पॅन गॅस वर गरम करत ठेवा.1 चमचा तूप घाला. तूप गरम झाल्यावर जिरे, कडीपत्ता,चिरलेला लसूण, लाल सुक्या मिरच्यांची खमंग फोडणी द्या. ही फोडणी आपल्या तयार खिचडीवर टाका.खिचडी तयार आहे.

  8. 8

    आपली डाळ खिचडी बनवून तयार आहे.तोंडी लावायला आंब्याचं लोणचं आणि पापड.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

Similar Recipes