डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ट्रेंडिंग
महाराष्ट्रात सगळीकडे रात्रीचे जेवण म्हटले की बहुतेक करून हलकी फूल की खिचडी खातात
खिचडी पचायला पण चांगली आहे व पटकन होणारी आहे

डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)

#ट्रेंडिंग
महाराष्ट्रात सगळीकडे रात्रीचे जेवण म्हटले की बहुतेक करून हलकी फूल की खिचडी खातात
खिचडी पचायला पण चांगली आहे व पटकन होणारी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
तीन चार
  1. 1 कपतांदूळ
  2. 1/2 कपतुरीची डाळ
  3. 1/4 कपमसूर डाळ
  4. 1/4 कपचना डाळ
  5. 1कांदा
  6. टमाटा
  7. 7-8 लसणाच्या पाकळ्या
  8. 7-8कढीपत्त्याची पाने
  9. 1हिरवी मिरची
  10. 1 टेबलस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पून लाल तिखट
  12. चवीनुसारमीठ
  13. 1/2 टेबलस्पूनकसुरी मेथी
  14. चिमुटभरहिंग
  15. 2 टेबलस्पूनतेल
  16. 1 टेबलस्पूनमोहरी
  17. 1 टेबलस्पूनजीरे
  18. 3-4लाल सुक्या मिरच्या
  19. कोथिंबीर

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे कांदा टमाटा बारीक चिरून घेणे

  2. 2

    सर्व डाळी एकत्र घेऊन दोन-तीन पाण्याने धुऊन घ्यावे प्रेशर कुकर लावून दोन तीन शिट्ट्या करून घ्याव्यात

  3. 3

    नंतर तांदूळ घेऊन पंधरा-वीस मिनिटे भिजत ठेवावे व एक पातेले घेऊन त्यात पाणी टाकून तांदूळ घालावे छान मोकळा भात करून घ्यावा

  4. 4

    एक भांडे घेऊन गॅस वर ठेवावे त्यात दोन टेबलस्पून तेल टाकून मोहरी जीरे घालावे तडतडले की त्यात हिरवी मिरची कढीपत्ता घालावा व कांदा घालावा कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतावा

  5. 5

    कांदा गुलाबी झाला की त्यात टमाटा घालुन थोडा होऊ द्यावा नंतर सर्व मसाले टाकून घ्यावे हिंग घालावा व शिजवलेली डाळ टाकावी

  6. 6

    डाळ टाकली की त्यात थोडं पाणी घालून एक उकळी येऊ द्यावीकसूरी मेथी घालावी नंतर त्यात शिजलेला भात टाकावा व मिक्स करून घ्यावे

  7. 7

    डाळ व भात छान मिक्स करून झाले की झाली आपली डाळ खिचडी तयार

  8. 8

    आता खिचडीवर तडका देण्यासाठी दोन-तीन लाल सुक्या मिरच्या लसुन कोथिंबीर घ्यावे

  9. 9

    तडका देण्यासाठी एक तडका पॅन घेऊन त्यात तेल टाकावे जीरे मोहरी हिंग घालावे लसन घालावे लाल मिरची टाकून कोथिंबीर घालावी व खिचडीला तडका द्यावा

  10. 10

    छान पापड मिरची सोबत सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes