कढी

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#फोटोग्राफी

ताकाची कढी म्हणजे झटपट होणार पदार्थ, रुचकर असल्याने तोंडाला स्वाद आणणारा,माझ्या माहेरी नारळ मुबलक असल्याने ताकाच्या कढीलाही ओलं खोबरं,हिरवी,
मिरची,आलं,लसूण,कोथिंबीर याच वाटण लावलं जात.

पण लावून केलेल्या कढीची चव वेगळीच.ताक थोडं आंबट असलं तर उत्तम,नसलं तरी बिघडत काहीच नाही.गरमागरम वाफाळता भात आणि कढी हा बेत अत्त्युत्तम आहे.सोबत सुरण,वांगी,बटाटे किंवा केल्याचे काप असले म्हणजे पुरे.कमी श्रमात उत्तम बेत.

घ्या तर साहित्य जमवायला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 200 ग्रॅमदही
  2. 20 ग्रॅमबेसन
  3. 5 ग्रॅमहिंग
  4. 5हिरव्या मिरच्या
  5. 7लसूण पाकळ्या
  6. 1 टिस्पुनफोडणीसाठी मोहरी, जिरे, मेथीदाणे, कढीपत्ता
  7. 20 ग्रॅमकोथिंबीर बारीक चिरून
  8. 20 ग्रॅमसाखर
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    दही घुसळुन ताक करा,साखर,मीठ मिसळून ढवळा,हळद,हिंग घालून ठेवा.

  2. 2

    फोडणी करून त्यात मोहरी,जिरे,मेथीदाणे, कढीपत्ता घाला,लसूण ठेचून घाला.बेसन पाण्यात मिसळून पेस्ट बनवा.

  3. 3

    लसूण लालसर परतून त्यात,बेसन पोस्ट मिसळून ताक घाला.कोथिंबीर घालून उकळी काढा.उकळी येईपर्यंत ढवळत राहा.

  4. 4

    गरमागरम वाफाळत्या भातासोबत अगर खिचडीसोबत आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नूतन सावंत
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes