अंडा करी (Anda curry recipe in marathi)

अनघा वैद्य
अनघा वैद्य @cook_22854866

खर तर मी लग्ना आधी कधीच अंडा करी खात नव्हते कारण माझ्या माहेरी चालत नव्हते,,आणि मी कधी विचार पण केला नव्हता की मी कधी अंडे खाईल, कारण कधी चव घेतली नव्हती,पण लग्ना नंतर माझ्या यजमानांनी जी अंडा करी खाऊ घातली ती पण स्वतः तयार करून की आज पर्यंत आठवड्यातून एकदा खाल्ल्या शिवाय होत नाही,आणि आता मी स्वतः करते अगदी याजमानासारखीच.

अंडा करी (Anda curry recipe in marathi)

खर तर मी लग्ना आधी कधीच अंडा करी खात नव्हते कारण माझ्या माहेरी चालत नव्हते,,आणि मी कधी विचार पण केला नव्हता की मी कधी अंडे खाईल, कारण कधी चव घेतली नव्हती,पण लग्ना नंतर माझ्या यजमानांनी जी अंडा करी खाऊ घातली ती पण स्वतः तयार करून की आज पर्यंत आठवड्यातून एकदा खाल्ल्या शिवाय होत नाही,आणि आता मी स्वतः करते अगदी याजमानासारखीच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मीं
6 सर्व्हिंग्ज
  1. 12अंडी
  2. 1मोठा कांदा
  3. 6हिरवी मिर्ची
  4. 8/9लसूण कळी
  5. 1 इंचआले
  6. 2 टेबल स्पूनखसखस
  7. 2 टेबलस्पूनधने
  8. 1 टेबलस्पूनखोबरा किस
  9. 1 टीस्पूनजिरे
  10. 2मोठी विलायची
  11. 1 इंचकलमी
  12. 2तेजपान
  13. 6/7शेंगदाणे
  14. 4/5फुटाणे किंवा चना डाळ
  15. 200 ग्रामतेल
  16. 2 टीस्पूनलाल तिखट
  17. 1 टीस्पूनहळद
  18. 1 टीस्पूनगरम मसाला
  19. भरपूर कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मीं
  1. 1

    प्रथम अंडी उकडून आणि सोलून ठेवा,वरील सामग्री मध्ये जे कोरडे पदार्थ दिले आहे ते कढईत थोडे तेल घालून परतून घ्या आणि मिक्सि मध्ये कोरडे एकजीव वाटण करून ठेवा,त्याच कढईत कांदा,मिर्ची,लसूण,आले थोडे परतून कांदे थोडे लालसर होईल असे परतून त्याचे वेगळे वाटण करून त्यानंतर कोरडे आणि कांद्याचे वाटण पुन्हा एकदा थोडे पाणी घालून मिक्सि वर वाटून घ्या.

  2. 2

    वाटण तयार झाले आहे,आता काढीत जरा जास्त तेल घालून सोललेले अंडी हलके तळून घ्या,,म्हणजे त्याचा वास निघून जातो,त्याच तेलात संपूर्ण वाटण घालून मंद आचेवर 5 मीं शिजू द्यावे,त्यात तिखट,हळद घालून पुन्हा 5 मी शिजवा,त्यानंतर तळलेले अंडी मसाल्यात घाला,5 मी नंतर त्यात गरम पाणी घाला,त्याने तेल छान वर येईल,आणि दिसेल ही छान,चवीनुसार मीठ,गरम मसाला,घालून 10 मी उकळून घ्या,गॅस बंद करून कोथिंबीर घाला.

  3. 3

    जेवताना लिंबू आणि कांदा सोबत घ्या,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
अनघा वैद्य
रोजी

Similar Recipes