उपवासाचे कैरी सार(kairi saar recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#cooksnap ही रेसिपि मी प्रीती साळवी ह्यांची **आंबा बाठीचे गराचे सार ** ही आवडल्याने ती पाहून थोडे इनोव्हेशन करून बनवले आहे.
उपवास साठी पिता यावे म्हणून थोडे बदल करून बनवले आहे.मी इथे आंबा नव्हे तर कैरी वापरली आहे. त्याचे सार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 minit
2 सर्व्हिन्ग
  1. 3कैरीच्या बाठी त्याची काढलेली साले
  2. 2 कपपाणी
  3. 4 टीस्पूनगूळ
  4. 3 टीस्पूनतूप
  5. 3लवंग
  6. 1/2 टीस्पूनआले
  7. 2मिरची तुकडे
  8. 1 टीस्पूनजिरे
  9. चवीनुसारमीठ
  10. 2 टीस्पूनकोथिंबीर बारीक चिरून

कुकिंग सूचना

20 minit
  1. 1

    प्रथम कैरीच्या बाठी व साले शिजवून घ्या.कैरी वापरली की त्याची बाठ व साले काढून घेते ते वाया जात नाही उपयोगी येत व असे सुंदर सार बनते.

  2. 2

    शिजून थंड झाले की बाठीचा दळ पाण्यात काढून घेणे. ते व साले मिक्सर चे भांड्यात घालणे.मग त्यात गूळ, लवंग, मीठ, आले घालून बारीक पेस्ट करून घेणे.गूळ व मीठ कैरीच्या आंबट पानावर अवलंबून राहील.

  3. 3

    कढईत तूप गरम करून जिरे घाला मग मिरची तुकडे कोथिंबीरघालून झाले की मग त्यात मिक्सर मधिल सारण घाला.

  4. 4

    आता 5, 7 मिनिट त्यास छान उकळी आणा चव पहा मीठ व गूळ हवे असल्यास त्याप्रमाणे घाला. गरम गरम प्यायला द्या. ह्यात आले व लवंग घातल्याने चवीस व पचनास व उपवास मध्ये अतिशय गुणकारी ठरते. जरूर ट्राय करा. एक na. लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes