आंब्याचा सार (ambyacha saar recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#amr

आंबाला फळांचा राजा असे म्हणतात
आंब्याचा प्रत्येक भाग हा उपयोगी आहे आंब्याच्या पानाला पूजेत खूप महत्त्व आहे तसेच आपले दार पण या पानांच्या तोरनाने सजते .
तसेच आज मी आंब्याच्या सार केला तो ही त्याच्या साल व कोयीच्या रसाने

आंब्याचा सार (ambyacha saar recipe in marathi)

#amr

आंबाला फळांचा राजा असे म्हणतात
आंब्याचा प्रत्येक भाग हा उपयोगी आहे आंब्याच्या पानाला पूजेत खूप महत्त्व आहे तसेच आपले दार पण या पानांच्या तोरनाने सजते .
तसेच आज मी आंब्याच्या सार केला तो ही त्याच्या साल व कोयीच्या रसाने

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
चार ते पाच
  1. आंब्याचा रस काढल्यानंतर उरलेली कोय व साल्ट
  2. आंब्याचा रस
  3. थोडी शेंगदाणे भाजून व त्याची साल काढलेले
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 5-6कडीपत्त्याचे पाने
  6. कोथिंबीर
  7. 1-2 चमचे बेसन
  8. 1 टेबलस्पूनजीरे
  9. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1-1.5 टेबलस्पून तिखट
  11. 1/2 टेबलस्पून हळद
  12. चवीनुसारमीठ
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. चिमुटभरहिंग
  15. थोडे पाणी

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    प्रथम आंब्याचा रस काढल्यानंतर कोई व साल्ट काढतोत त्यात पाणी काढून त्याचा रस काढून घेणे

  2. 2

    सर्व साहित्य एकत्र करून घेणे

  3. 3

    आंब्याच्या कोईत पाणी टाकून रस काढून घेने त्यात आंब्याचा रस थोडा टाकून घेणे त्यात एक चमचा बेसन घालावे व नीट मिक्स करून घ्यावे गुठळ्या राहू देऊ नये

  4. 4

    नंतर गॅसवर एक भांडे ठेवून त्यात तेल काढणे तेल तापले की जीरे टाकावे हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर घालावे थोडा हिंग घालावा नंतर तिखट मसाला व हळद टाकून घेणे

  5. 5

    नंतर वरील आंब्याच्या रसाचे मिश्रण घालावे चवीनुसार मीठ टाकावे व गुळ घालून घ्यावा जर आंब्याचा रस आंबट असेल तर गुळ थोडा जास्त लागले त्याप्रमाणे गूळ कमी जास्त करून घ्यावा

  6. 6

    नंतर शेंगदाणे टाकून घ्यावे एक उकळी येऊ द्यावी झाला आपला आंब्याचा सार तयार

  7. 7

    कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes