फणस मसाला भाजी (fanas masala bhaaji recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#cooksnap
वसुधा गुधे यांची फणस मसाला भाजीची रेसिपी ट्राय केली आहे.

फणस मसाला भाजी (fanas masala bhaaji recipe in marathi)

#cooksnap
वसुधा गुधे यांची फणस मसाला भाजीची रेसिपी ट्राय केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५०० ग्राम फणस
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टेबल स्पूनअद्रक लसूण पेस्ट
  5. 2 टेबल्स्पूनतेल
  6. 2 टीस्पून तिखट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 2 टीस्पूनगोडा मसाला
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 2 टी स्पूनधने पावडर
  11. 2 टीस्पूनमीठ
  12. 1 चिमूटहिंग
  13. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम कुकर मध्ये तेल टाकावे.
    कुकर गॅसवर ठेवावे व तेल तापू द्यावे.
    या तेलात फणसाचे तुकडे तळून घ्यावे.
    फणसाचे तुकडे लाईट ब्राऊन झाल्यावर काढून घ्यावे.

  2. 2

    एकीकडे कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट एकत्रित करून त्याची पेस्ट बनवावी.
    कुकर मध्ये तेल घेऊन त्यात जिरे मोहरी आणि मिरचीची फोडणी घालावी.

  3. 3

    जिरे मोहरी तडतडल्यावर त्यात ही पेस्ट टाकावी.
    या पेस्टला तेल सुटू द्यावे.
    वरील सर्व मसाले या पेस्टमध्ये टाकावे.
    दोन मिनिटे चमच्याने फिरवत रहावे व त्यात तळलेल्या फणसाच्या फोडी ऍड कराव्या.
    पाच मिनिटे झाकून फणसाच्या फोडी मसाल्यात शिजू द्याव्या.

  4. 4

    तेलावर फोडी शिजल्यानंतर त्यात एक ग्लास पाणी ॲड करावे.
    कुकरचे झाकण लावून पाच मिनिटे कुकर मध्ये भाजी शिजू द्यावी.
    आपली भाजी रेडी आहे त्यावर कोथिंबीर टाकून गार्निश करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes