फणस मसाला भाजी (fanas masala bhaaji recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#फणसाचीभाजी संडे स्पेशल आज मी बनवली फणसाची भाजी माझी फेवरेट मी बाजारात गेली होती भाजीचं आणायला आणि फणस आणणार नाही, झालं मग माझं फेवरेट. पण माझ्या घरी कुणालाच आवडत नाही. माझ्या यांना तर अजिबात आवडत नाही. पण करतेस मी त्यांच्यासाठी माझं मन का बरं मारू मला जे आवडते ते मी करते. त्यांच्या पण आवडीनिवडीच करत असते. एक सांगू का मी लहान असताना माझ्या माहेरी माझ्या बाबा ला फणसाची भाजी खूप आवडायची. ते मार्केटला गेले कि फणस आणत होते. आम्ही सगळे आवडीने फसणाची भाजी खात होतो लहानपणीच्या आठवणी किती गोड असतात. कितीही म्हटलं तरी आपण विसरू शकत नाही. आणि माझ्या तर खूप आहे आंबट ,खारट ,तिखट, आणि गोड पण फणसाची भाजी केली. मला माझ्या जुन्या आठवणी आठवतात . चला तयार करते फणसाची भाजी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. 1/2 किलोफणस
  2. 2कांदे
  3. थोडंखोबरा
  4. 2 चमचेशेंगदाणे
  5. कलमी
  6. 1वेलदोडा
  7. 1 चम्मचमीठ
  8. 2विलायची
  9. 1 चमचाखसखस
  10. दीड चमचा तिखट
  11. 1/2 टी स्पूनहळद
  12. 1 चम्मचवाघमारे मसाला
  13. 1 चम्मचधनेपूड
  14. कोथिंबीर
  15. तेल तीन डाबले
  16. 1 चम्मचलसन जिरा पेस्ट
  17. 1टमाटर

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    शेंगदाणे,खोबरे,कांदे,खसखस,विलायची भाजून घ्या मंद आचेवर लालसर झाली कि गॅस बंद करा आणि मिक्सर मधून बारीक करून घ्या.

  2. 2

    फणसाला तेल लावून बारीक चिरून घ्या. कढाई मध्ये एक चमचा तेल टाकून फणस टाका व पाच मिनिट मंद आचेवर परतूनघ्या चमच्याने हलवत राहा.

  3. 3

    पातेल्यात चार चमचे तेल टाका. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी-जास्त टाकू शकता..तेल गरम झाल्यावर केलेला मसाला टाका आणि परतत राहा एक मिनिटानंतर तिखट मीठ टाका आणि टमाटे टाकून हलवत रहा तेल सुटेपर्यंत गोडसे साईटने तेल सुटणे सुरू होते मग त्यामध्ये फणस टाका आणि पाच मिनिट तसाच वाफेवर होऊ द्या झाकण ठेवून.

  4. 4

    पाच मिनिट झाले की गरम करून पाणी तुम्हाला पाहिजे तेवढे ऍड करू शकता किंवा थोडेसे कमी सोडून सुखी पण करू शकता आणि शिजवायला ठेवा दहा मिनिट शिजू द्या शिजली की नाही म्हणून तुम्ही फोडीला थोडंसं दाबून पहा जर फोड आरामात तुटली तर समजायचं भाजी शिजली वरून कोथिंबीर आणि मसाला सोहळा झाली फणसाची मसालाभाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes