परवलची भाजी (Parwal chi bhaji recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

परवल ही भाजी अतिशय उत्तम आहे शरीरासाठी. वेट लॉस, बी. पी., शुगर कंट्रोल करते. कॅलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते.काही वेगळी भाजी खायची इच्छा झाली त्यामुळे परवल च्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे.

परवलची भाजी (Parwal chi bhaji recipe in marathi)

परवल ही भाजी अतिशय उत्तम आहे शरीरासाठी. वेट लॉस, बी. पी., शुगर कंट्रोल करते. कॅलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते.काही वेगळी भाजी खायची इच्छा झाली त्यामुळे परवल च्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिटे
  1. 1/2 पाव परवल
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1 टेबलस्पूनलसूण अद्रक पेस्ट
  4. 1 टेबलस्पूनतिखट
  5. 1 टेबलस्पूनधने पावडर
  6. 1 टेबलस्पूनजिरे पावडर
  7. चवीपुरतं मीठ
  8. 1/4 टेबलस्पूनहळद
  9. 1/2 मोठा चमचातेल
  10. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    परवल पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुऊन घ्यावे. धुतल्यानंतर बारीक चिरून घ्यावे.

  2. 2

    कढई मध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकावा.कांदा लालसर झाल्यावर लसुन अद्रक ची पेस्ट टाकावी. तिखट,हळद,मीठ,जिरे पावडर,धने पावडर टाकावी.

  3. 3

    त्यानंतर बारीक चिरलेले परवल टाकावे. आणि मंद आचेवर अर्धा तास शिजवावे.अर्धा तासानंतर परवल शिजले की नाही हे बघावे. परवल थोडे जरड असतात त्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो.

  4. 4

    परवल शिजल्यावर गॅस बंद करावा.सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घ्यावे आणि वर कोथिंबीर पेरावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes