मिक्स व्हेज कोफ्ता करी (mix veg kofta curry recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#कोफ्ता
स्वयंपाक करायचा म्हटलं की सर्वप्रथम भाजी कुठली करायची हा मोठा यक्षप्रश्न समोर उभा राहतो....त्यात फ्रीजमधल्या भाज्या संपलेल्या असतील तर आणखीन गोंधळ...नाटकातला नाही हो भाज्यांचा म्हणते मी !!......असंच काहीसं आज झालंय..फ्रीज उघडून बघते तर काय भाज्या सगळ्या संपलेल्या ...बटाटे कायते ओरडून-ओरडून सांगत होते मी सज्ज आहे आज स्वतःचा बळी द्यायला ....कालच मुलींनी मंचुरियन चा बेत आखला आणि त्यातील एक शिमला मिरची ,थोडी पत्ताकोबी दिसली आणि ठरवलं आज सगळ्यांचा एकत्र संगम घडवून आणायचा..सोबतीला उरलेली पालकही धावून आली आणि शेवटी त्यांच्या रूपात मला आज संध्याकाळच्या भाजीचा सावळा गोंधळ सावरता आला....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1शिमला मिरची
  2. 1/2 वाटी पत्ता कोबीचा कीस
  3. 1/2 वाटीउकडलेल्या बटाट्याचा कीस
  4. 1/2 वाटीबारीक चिरलेला पालक
  5. 1/2 टीस्पूनधने पावडर
  6. 1/2 चमचाजिरे पावडर
  7. 1 चमचा लाल तिखट
  8. 1 चमचा मीठ
  9. 1/4 वाटी कोथिंबीर
  10. 4 लहान चमचा बेसन
  11. ग्रेव्ही करिता एक मध्यम आकाराचा कांदा
  12. 1/4 वाटी खोबऱ्याचे तुकडे
  13. 1/2 चमचा खसखस
  14. 1/2 चमचा धने पावडर
  15. 1/2 चमचा जिरेपूड
  16. 1 चमचा लाल तिखट
  17. 1/2 चमचाकश्मीरी लाल तिखट
  18. 1 टिस्पूनमीठ
  19. 1टमाटर
  20. 1/4 वाटी कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    कोफ्ते --प्रथम एका बाऊलमध्ये किसलेली शिमला मिरची,पत्ता गोबी,बटाट्याचा कीस, बारीक चिरलेली पालक,धने पावडर,जिरे पावडर,लाल तिखट, गरम मसाला,हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे...पाणी घालू नये.

  2. 2

    नंतर तयार मिश्रणाचे छोटे-छोटे कोफ्ते करून गरम तेलातून तळून घ्यावेत....तेल थंड असता कामा नये...नाहीतर कोफ्ते फुटायची भीती असते..

  3. 3

    ग्रेव्ही सगळ्यात आधी कांदा, खसखस, खोबऱ्याचे तुकडे लालसर भाजून मिक्सर मधून वाटून घ्या...नंतर एका कढईत चार चमचे तेल घाला. तेल गरम झाले की त्यात कांदा खोबऱ्याचे वाटण घालून छान तेल सुटेस्तोवर परतून घ्या. नंतर त्यात धने पावडर,जिरे पावडर, लाल तिखट,हळद, मीठ,टोमॅटो घालून छान एक ते दोन मिनिटे शिजवून घ्या.....

  4. 4

    मसाला तेलात शिजला की गरम मसाला आणि एक कप गरम पाणी घाला...पाण्याला उकळी आली की तयार कोफ्ते त्यात सोडायचे आणि परत दोन मिनिटांवर शिजवून घ्यायचे...तयार झालेल्या कोफ्ता करी वर कोथिंबीर पेरून गार्निश करायचे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes