बीट-स्विटकॉर्न कोफ्ता ईन शेजवान राईस(beet sweetcorn kofta in schezwan rice recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#कोफ्ता
ह्यावेळी कोफ्ता करी नं करता शेजवान राईस सोबत कोफ्ता संयोग घडवला . तेही बीट अन् मधुमका दुर्मिळ मिलन करून ..

बीट-स्विटकॉर्न कोफ्ता ईन शेजवान राईस(beet sweetcorn kofta in schezwan rice recipe in marathi)

#कोफ्ता
ह्यावेळी कोफ्ता करी नं करता शेजवान राईस सोबत कोफ्ता संयोग घडवला . तेही बीट अन् मधुमका दुर्मिळ मिलन करून ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. कोफ्ता साठी साहित्य
  2. दीड कप मधुमक्‍याचे दाणे
  3. 1मध्यम आकाराचे बीट किसलेले
  4. 2मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  5. 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  6. 1 टिस्पून धणेपूड
  7. 1/2 टिस्पून तिखट
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1/2 टी स्पूनगरम मसाला
  10. 1 टेबल स्पूनकॉर्नफ्लोर
  11. 1 टेबल स्पूनबेसन
  12. तळण्यासाठी तेल
  13. राईस साठी साहित्य
  14. 2 कपबासमती तांदूळ धुतलेले
  15. 1मध्यम आकाराचे गाजर लांब काप
  16. 1मध्यम आकाराचा कांदा लांब कापलेला
  17. 7लसणाच्या कळ्या लांब कापलेल्या
  18. 2लाल टोमॅटो लांब कापलेले
  19. 1 टेबलस्पूनतेल
  20. 1 टेबलस्पूनतयार शेजवान मसाला (यामध्ये मीठ असल्याने वेगळे मीठ घ्यायची गरज नाही)
  21. 1/2 टीस्पूनजिरे

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य तयार ठेवून एकीकडे बासमती तांदूळ अगदी कमी पाण्यामध्ये शिजवायला ठेवावा. हा तांदूळ आपल्याला 70% शिजवायचा आहे.दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मधु मक्याचे दाणे,मीठ,तिखट, धणे पूड व गरम मसाला घालून मिक्सरवर वाटून घ्यावे.

  2. 2

    वाटलेले मधू मक्याचे दाणे एका भांड्यात घेऊन त्यामध्ये बटाटा कुस्करून, बिटाचा कीस,कॉर्नफ्लोअर व बेसन घालून एकत्र मिश्रण तयार करावे व त्याचे कोफ्ते तळून घ्यावेत.

  3. 3

    70 टक्के शिजलेला मोकळा भात तयार ठेवावा.कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून जिरे घालुन हाय गॅसवरच वेगाने लसूण,कांदा,गाजर टोमॅटोचे काप परतावे.

  4. 4

    ह्याच दरम्यान कढईमध्ये आता मोकळा भात व शेजवान मसाला घालून हाय गॅसवरच मिक्स करून घ्यावे व थोडेसे परतावे.आता त्यामध्ये कोफ्ते ऍड करून हलकेसे परतून गॅस बंद करावा.या पदार्थांमध्ये भाताच्या बरोबरीने कोफ्ते घेतले आहेत,त्यामुळे खाणाऱ्याला भाताच्या प्रत्येक घासाबरोबर त्याची मजा चाखता येईल. हा कोफ्ता राईस सर्व्ह करताना मसाला ताक किंवा एखादी ग्रेव्ही देता येईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (5)

Similar Recipes