पुरंदर मिसळ (purandar misal recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#रेसिपीबुक
पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हानदी व भोगावती (चांबळी) नदी यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे.
आठवड्याची थीम आहे - गावाकडची आठवण मग मला डोळ्यासमोर नाव आले चंदूची मिसळ. आता प्रत्येक भागात मिसळ बनवली जाते पण तरीही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
६ सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅममटकी
  2. 3कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 50 ग्रॅमखोबरे
  5. 1 टेबल स्पूनआल लसुण पेस्ट
  6. 1 टेबल स्पूनगरम मसाला
  7. 1 टेबल स्पूनगोडा मसाला
  8. 3 टेबल स्पूनलाल तिखट
  9. 1 टेबल स्पूनमिसळ मसाला
  10. 1 टीस्पून हळद
  11. चवीनुसारमिठ
  12. 3-4 ग्लासगरम पाणी
  13. 2 वाटीतेल
  14. 1छोटासा गुळाचा खडा
  15. 1 टेबलस्पूनकोथिंबीर, कडीपत्ता,
  16. 1लिंबू,
  17. 12 पाव,
  18. 5 टेबलस्पून बटर
  19. 1 टीस्पूनजिरे, मोहरी,
  20. मिरची
  21. फरसाण, पाव,
  22. 1 वाटीगोड दहि

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी,कडीपत्ता, मिरची घालून छान फोडणी करा आता यात बारिक चिरलेला कांदा आणि आल लसुण पेस्ट, हळद घालून २ मिनट छान परता आता यात मटकी टाका आणि मिक्स करून घेणे यात १ ग्लास पाणी आणि चवीनुसार मिठ घालून १५ मिनट शिजवून घ्या किंवा कुकरमध्ये एक शिट्टी करून शिजवून घ्या.

  2. 2

    कट/रस्सा- उभ कट केलेले खोबरे पॅन मध्ये तेल टाकून खरपूस भाजा, नंतर कांदा भाजून घ्या आता टोमॅटो पण भाजून घ्या नंतर मिक्सर मध्ये 1 टेबल स्पून लाल तिखट टाकून या सर्वांची पेस्ट करून घे

  3. 3

    आता पॅन मध्ये तेल गरम करून तयार केलेली पेस्ट घालून 3 मिनट परता. आता यात गोडा मसाला, गरम मसाला, लाल तिखट आणि गुळाचा खडा घालून छान परता. आता यात शिजवून घेतलेली मटकी घाला. आवश्यक ते नुसार गरम पाणी आणि चवीनुसार मिठ घालून १० मिनट उखळी काढून घ्या.

  4. 4

    आपली मिसळ तयार. फरसाण आणि पाव बरोबर वरुन कोथिंबीर आणि कांदा घालून सव्हिं॔ग करा(फरसाण ऐवजी शेवचीवडा असेल तर खूपच भारी टेस्ट येते)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Similar Recipes