पनीर आलू टिक्की (paneer aloo tikki recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#झटपटरेसिपी
"आई खूप भूक लागलीये..मी येतोच आहे घरी 15-20मिनीटात..काहीतरी yummy कर खायला"..हा असा पुकारा असो किंवा मग कोणी नातेवाईक,मैत्रिणी,ओळखीचे असोत.."अगं आम्ही दादरला खरेदीला आलो होतो ...आहेस ना घरी...भेटावं म्हणतोय तुला..15-20मिनीटात येतोच हं..वेळ नाहीये जास्त आमच्याकडे..फक्त भेटायचयं तुला"...अशी प्रेमळ इच्छा असो..
15-20मिनीटात आपल्या हातचा काहीतरी चमचमीत पदार्थ करुन खायला घालावा..इतक्या प्रेमाने ,अगत्याने आपल्याला सांगतायत,भेटायला येतायंत...ही माझी भावना..
मग यातूनच 15-20मिनीटात होणारे वेगवेगळे पदार्थ
#झटपट आकार घेतात...आणि *अतिथी देवो भव* म्हणत मी
पाहुण्यांच्या ,मुलांच्या समोर आनंदाने पेश करते ..आणि त्यांच्या चेहर्यावर,डोळ्यात तृप्तीचे भाव दिसले की कृतकृत्य होते मी..😊
चला तर मग असाच झटपट होणारा चमचमीत पदार्थ करु या...#आलू_पनीर_टिक्की...Taste bhi Health bhi..😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्राम पनीर
  2. 1.5 कपब्रेड क्रम्स
  3. 10-15काजू तुकडे
  4. 10-15बेदाणे
  5. 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट
  6. 7-8मिरच्या बारीक तुकडे करून
  7. 1 टीस्पून काळी मिरी पावडर
  8. 1/4 कपउकडलेले मटार
  9. 5मोठे बटाटे उकडूून किसून
  10. चवीनुसारमीठ
  11. 2 टेबलस्पून साजूक तूप
  12. 1/4 टीस्पूनटी.स्पून वेलची पावडर
  13. 2 टेबलस्पून रवा
  14. तळण्यासाठी तेल
  15. 1 टीस्पून साखर
  16. 2 टेबलस्पून सुके खोबरे

कुकिंग सूचना

20-25मिनीटे
  1. 1

    प्रथम बटाटे उकडूून किसून घ्यावे.त्यात आलं लसूण पेस्ट,मीठ घालून मिक्स करुन ठेवा.. मंद गॅसवर कढईत तूप टाकून काजू बेदाणे तळून घ्या..त्यातच पनीरचे तुकडे घालून पनीर सोनेरी रंगावर परतून घ्या.

  2. 2

    आता या मिश्रणात काळी मिरी पावडर,साखर, चवीनुसार मीठ,मिरचीतुकडे,वेलची पावडर,उकडलेले मटार,खोबरे घालून 2-4वाफा आणाव्यात.

  3. 3

    हे मिश्रण थोडे गार झाल्यावर बटाट्याच्या मिश्रणात एकत्र करा..नंतर ब्रेड क्रम्स घालून मिश्रण एकजीव करा..टिक्क्या तयार करा..

  4. 4

    आता या टिक्क्या रव्यामध्ये घोळवून तेलामध्ये सोनेरी रंगावर तळून घ्या..आणि केचप बरोबर सर्व्ह करा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes