आलू टिक्की बर्गर (aloo tikki burger recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

शेफ निनाद आम्रे यांनी लाईव्ह दाखवलेली रेसिपी. सर्वांनी मिळून ऑनलाईन लाईव्ह शिकलेली व करून बघितलेली ही रेसिपी.
शेफ बरोबर करायला मज्जा आली. नवीन रेसिपी शिकायला मिळाली.
मी फोटो काढले नव्हते म्हणून परत एकदा करून बघितली व फोटो काढले.

आलू टिक्की बर्गर (aloo tikki burger recipe in marathi)

शेफ निनाद आम्रे यांनी लाईव्ह दाखवलेली रेसिपी. सर्वांनी मिळून ऑनलाईन लाईव्ह शिकलेली व करून बघितलेली ही रेसिपी.
शेफ बरोबर करायला मज्जा आली. नवीन रेसिपी शिकायला मिळाली.
मी फोटो काढले नव्हते म्हणून परत एकदा करून बघितली व फोटो काढले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 जणांसाठी
  1. 4बर्गर बन
  2. पॅटी/टिक्की साठी साहित्य
  3. 3-4उकडलेले बटाटे
  4. 1/2 कपउकडलेले मटार
  5. 1/2 कपभिजवून निथळलेले पोहे
  6. 1 कपब्रेड क्रम्स
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1 टेबलस्पूनधने-जीरे पावडर
  9. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पूड
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 2-3 टेबलस्पूनआलं किसून किंवा पेस्ट
  13. चवीप्रमाणे मीठ
  14. पॅटी/ टिक्की बॅटर
  15. 2-3 टेबलस्पूनमैदा
  16. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पूड
  17. चवीप्रमाणे मीठ
  18. थोडे पाणी
  19. तळण्यासाठी तेल
  20. बर्गर ऑरगनाइज करण्यासाठी
  21. लेटूस ची पाने किंवा कोबी
  22. 1/2सिमला मिरची
  23. 1कांदा
  24. 1टोमॅटो
  25. 3-4 टेबलस्पूनमेयोनिज
  26. 2-3 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  27. 4स्लाईस चीज
  28. थोडेसे बटर
  29. थोडे चिली प्लेक्स

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    बटाट्याची साले काढून कुस्करून घेणे. मटारचे दाणे शिजवून कुस्करून करून घेणे. एका बाऊलमध्ये दोन्ही एकत्र करून, भिजवलेले पोहे, सर्व मसाले व मीठ घालून मिक्स करून घेणे. मिश्रण चांगले मळून घेणे व या मिश्रणाचे बर्गरच्या आत बसेल एवढ्या आकाराचे गोळे बनवून थोडे चपटे करून घेणे.

  2. 2

    एका वाटीत मैदा, काळीमिरी पूड, मीठ व थोडीसे चिलीप्लेक्स घालून मिक्स करून घेणे व थोडे-थोडे पाणी घालून, व्यवस्थित मध्यम पातळसर बॅटर बनवून घेणे.त्यात तयार टिक्की घोळवून घेणे व ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेणे. **ज्यादाचे पॅटी बनवून तुम्ही हवाबंद डब्यात ठेवावे. डबा फ्रीजमध्ये ठेवावा.जेव्हा हवे तेव्हा काढून तळून घ्यावेत.

  3. 3

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यात तयार पॅटी दोन्ही बाजूंनी छान लालसर तळून घेणे. गॅसवर तवा तापत ठेवावा. त्यावर थोडे बटर घालावे. बन सुरीने मध्यभागी कापून घेऊन बटरवर दोन्ही बाजूंनी गरम करून घेणे.

  4. 4

    कांदा, टोमॅटो यांचे पातळ गोल काप कापून घेणे.कोबी, सिमला मिरची बारीक चिरून घ्यावेत व त्यावर काळीमिरी पूड व मीठ घालून मिक्स करून घेणे.बनचा खालचा भाग घेऊन त्याला मेयाॅनिज लावून घेणे.नंतर लेटूस चे पान किंवा कोबी,सिमला मिरचीचे मिश्रण घालून घेणे.कांदा, टोमॅटो चकत्या ठेवणे.

  5. 5

    त्यावर तयार पॅटी ठेवणे.पॅटीवर स्लाईस चीज ठेवणे.त्यावर त्यावर पिझ्झा मसाला किंवा पेरी पेरी मसाला घालावा. आवडत असल्यास. एका छोटया वाटी मध्ये 2 टेबलस्पून मेयोनिज व 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस एकत्र करुन चांगले हलवून घेणे.बनचा वरचा भाग त्याला तयार केलेला साॅस लावून घेणे.तो भाग वरती ठेवून टूथपिक मध्यभागी लावून घेणे.म्हणजे आतील साहित्य हलणार नाही.

  6. 6

    खाण्यासाठी तयार आलू टिक्की बर्गर!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes