खस्ता आलू मटार लेअर समोसा (khasta aloo mutter layer samosa recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#GA4
#week21
Keyword- Samosa

समोसा, सौमसा, सम्बोसक, सम्बूसा, समूसा, सिंघाड़ा इत्यादी नावाने ओळखला जाणारा समोसा हा सर्वांचाच आवडता‌.
स्ट्रीट फूड मधील एक लोकप्रिय पदार्थ .
नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं...😋😋
आता तर , विविध प्रकारच्या स्टफिंगसने भरलेले समोसे आपल्याला पाहायला मिळतात.
असाच एक माझा आवडता ,बटाटा ,मटारच्या चमचमीत स्टफिंग्सने भरलेला , लेअर समोसा सादर करीत आहे..😊

खस्ता आलू मटार लेअर समोसा (khasta aloo mutter layer samosa recipe in marathi)

#GA4
#week21
Keyword- Samosa

समोसा, सौमसा, सम्बोसक, सम्बूसा, समूसा, सिंघाड़ा इत्यादी नावाने ओळखला जाणारा समोसा हा सर्वांचाच आवडता‌.
स्ट्रीट फूड मधील एक लोकप्रिय पदार्थ .
नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं...😋😋
आता तर , विविध प्रकारच्या स्टफिंगसने भरलेले समोसे आपल्याला पाहायला मिळतात.
असाच एक माझा आवडता ,बटाटा ,मटारच्या चमचमीत स्टफिंग्सने भरलेला , लेअर समोसा सादर करीत आहे..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
८ ते ९ सर्व्हिंग
  1. 4मोठे बटाटे उकडून
  2. 1/4 किलोमटार वाफवून
  3. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  4. 1 टीस्पूनगरम मसाला
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 2 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनधणेपूड
  8. मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर
  10. 1कांदा बारीक चिरलेला
  11. आवरण्यासाठी
  12. 2 कपमैदा
  13. मीठ चवीनुसार
  14. 1 टीस्पूनओवा
  15. 3 टेबलस्पूनतूप
  16. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    पॅन गरम करून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट परतून घ्या.नंतर त्यात कांदा घालून तो ही छान परतून घ्या.

  2. 2

    नंतर वरील सर्व मसाले,मीठ घालून परतून घ्या.उकडलेले बटाटे,मटार घालून मॅश करून घ्या‌. भाजी व्यवस्थित परतून मिक्स करा.५ मि.शिजू द्या. वरून कोथिंबीर घाला.

  3. 3

    बाऊलमधे मैदा,मीठ,तूप घालून मिक्स करून घ्या.मैद्याला तूप छान चोळून‌ घ्या.त्यामुळेच समोसा छान क्रिस्पी होईल. पाणी घालून घट्टसर गोळाज्ञमळून घ्या. २० मि.झाकून ठेवा‌.

  4. 4

    पिठाची थोडी जाडसर पोळी लाटून झाकण्याच्या साहाय्याने गोलाकार कट करा.व पुन्हा अंडाकृती आकारात लाटा. मध्य भागापासून पुढे सुरीने अशा रेषा पाडून घ्या.व संपूर्ण पोळीला पाणी लावून प्लेन बाजू लेअरच्या पोळीवर दूमडून घ्या.

  5. 5

    तयार घडीचा त्रिकोण तयार करा‌.पाण्याच्या साहाय्याने व्यवस्थित चिटकवून घ्या. भाजीचे मिश्रण भरून घ्या.कडेला पाणी लावून बोटाने व्यवस्थित कडा बंद करा.

  6. 6

    तेल गरम करून‌ दोन्ही बाजूने समोसे खरपूस तळून‌घ्या.

  7. 7

    चटणी,साॅस सोबत सर्व्ह करा, चमचमीत खस्ता समोसा...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes