स्टफड् इडली(stuffed idli recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#स्टफड #week1
आपल्याकडे न्याहारी साठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. दाक्षिणात्य पदार्थ तर आपण नेहमी खातो. इडली, डोसा, मेदूवडा, अप्पम इत्यादी बरेच प्रकार आपण बनवतो. आज मी इडलीचा एक नवीन अवतार बनवला. थोडं वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला.

स्टफड् इडली(stuffed idli recipe in marathi)

#स्टफड #week1
आपल्याकडे न्याहारी साठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. दाक्षिणात्य पदार्थ तर आपण नेहमी खातो. इडली, डोसा, मेदूवडा, अप्पम इत्यादी बरेच प्रकार आपण बनवतो. आज मी इडलीचा एक नवीन अवतार बनवला. थोडं वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. 2 कपरवा
  2. 1 कपदही
  3. 1 कपपाणी
  4. 4उकडलेले बटाटे
  5. 1 चमचातेल
  6. 1 चमचालाल तिखट
  7. 1टिस्पून जीरे पावडर
  8. 1टिस्पून चाट मसाला
  9. 1टिस्पून हळद
  10. चवीनुसारमीठ
  11. 1टिस्पून मोहरी
  12. 1टिस्पून जीरे
  13. 1/2टिस्पून हिंग

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्वात प्रथम रवा, दही आणि पाणी मिक्स करून घ्या. अर्धा तास बाजूला ठेवून द्या. तोपर्यंत भाजीची तयारी करा.

  2. 2

    उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरं, कडिपत्याची फोडणी करा. कुस्करलेले बटाटे घालून परतून घ्या. सर्व मसाले टाकून चवीनुसार मीठ टाका. कोथिंबीर टाकून चांगले परतून घ्या आणि मिश्रण थंड करत ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लंबगोलाकार आकाराचे गोळे तयार करा. हे गोळे दहा मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. इडलीचे बॅटर सेट झाले की त्यात इनोचे दीड पाकीट टाकून चांगले ढवळून घ्या

  3. 3

    इडली साठी कूकर गरम करत ठेवा. तीन पेले घ्या त्यांना आतून तेल लावा. पेल्यामध्ये आधी इडलीचे बॅटर् टाकून त्याच्या बरोबर मध्ये बटाट्याच्या भाजीचा गोळा ठेवून परत वरती इडलीचे बॅटर् ओता.

  4. 4

    अशा प्रकारे तिन्ही पेले भरून घ्या आणि कूकर मध्ये स्टिम करायला ठेवा.वीस मिनिटांनी कूकर बंद करा. थंड झाल्यावर सुरीने अलगद इडल्या काढून घ्या.

  5. 5

    मग एका पसरट पॅनमध्ये तेल टाकून राई, जीरं, हिंग, कडिपत्त्याची फोडणी करा. लाल तिखट हळद टाकून इडली फ्राय करून घ्या. थंड झाल्यावर त्याचे गोल तुकडे करून चटणी किंवा टोमॅटो सॉऽस् बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes