दुधी हलवा (dudhi halva recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#रेसिपीबुक
#week 3
नैवेद्य
😋दुधीहलवा😋
दुधी भोपळा...... नाक मुरडले ना... हो हो बहुतेक सगळ्यांंना च आवडतो असे नाही😀 हलवा खायला आणि करायला कोणत्याही विशेष समारंभ किंवा उत्सवाची गरज नसते. दूधी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा दूधी हलवा सहज बनवता येतो.दुधी भोपळ्यापासून बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे दुधीहलवा.अतिशय चवदार लागतो.गोड काहीतरी आणि पौष्टीक आणि स्वादिष्ट अशी रेसिपी.दूधीभोपळा ही भाजी एक हेल्दी, पित्तनाशक, कोलोस्ट्रॉल कमी करणारी अशी सद्गगुणी भाजी आहे.दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहे पथ्या साठी. दुधी हलवा गरम किंवा गार कसा ही छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
४ ते ५ जणांसाठी
  1. 400 ग्रामदुधी किस
  2. २०० ग्रॅम साखर
  3. २०० मिली (१ वाटी) म्हशीचे दुध
  4. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. १०० ग्रॅम (अर्धी वाटी) मावा
  6. 3/4 चमचावेलची पूड
  7. 1 टेबलस्पूनसुकामेवा आवडीनुसार

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    दुधी बिनबियांचा असावा तसेच कोवळा विकत घ्यावा.दुधीची साले काढून मध्यम किसणीवर किसून घ्यावा. दूधी किसून, कीस पाण्यात भिजवून ठेवावा. दुधी किस काळा पडत नाही. किसलेला दुधी पिळून पाणी काढून घ्यावे

  2. 2

    कुकरमध्ये दुधी शिजवून घ्यावा. एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यात शिजवलेला दुधी घालावा आणि दोनचार मिनीटे मध्यम आचेवर परतावा.

  3. 3

    थोड्यावेळानंतर साखर, वेलचीपूड, सुकामेवा,मावा घालावा आणि ढवळावे. आच मध्यम ठेवावी. साखर वितळेल आणि दुधी हलवा घट्ट होईल. एकदम छान घट्ट झाले कि गॅस बंद करावा.

  4. 4

    हलवा गरम किंवा गार कसाही छान लागतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes