कलाकंद (kalakand recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#रेसिपीबुक #week6
चंद्रकोर १
कलाकंद हा महाराष्ट्रातील विशेषत: बेळगावातला खाद्यपदार्थ आहे. बेळगावी कुंदा आणि बेळगावी कलाकंद प्रसिद्ध आहेत. दुग्धजन्य पदार्थ तर सगळ्यांना आवडतात. अशातच सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे घराघरांत गोड पदार्थ आणि मिठाईंची रेलचेल सुरु आहेच. कलाकंद म्हणजे किंचित गोड आंबट अशी मिश्रित चव असणारा अस्सल देशी पदार्थ आजही ग्रामीण भागात आपला प्रभाव टिकवून आहे. ह्या आठवड्यात चंद्रकोरची थीम मिळाली आहे म्हणून कलाकंदला मी चंद्रकोरचा आकार दिला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1 लीटरपूर्ण मलई दूध
  2. 1/2लिंबाचा रस
  3. 1/2 कपसाखर
  4. 2 टेबलस्पूनगुलकंद
  5. 1टिस्पून केशर इलायची सिरप
  6. 1/2 टिस्पून वेलची पूड
  7. 7-8 काजू बदामाचे काप

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम एक लीटर मधील १/२ लीटर दूध एका भांड्यात गरम करत ठेवा. उरलेले १/२ लीटर दूध एका जाड बुडाच्या पॅनमध्ये गरम करायला ठेवा. हे दूध बासुंदी सारखे आटवायचे आहे. भांड्यामधले दूध चांगले गरम झाले कि त्यामध्ये लिंबाचा रस टाकून गॅस बंद करा आणि दूध ढवळत रहा. आता चमच्याने एकाच दिशेने हलवत रहा. दूध नासण्याची प्रक्रिया चालू होते आणि गोळा तयार होऊन दूधापासून पनीर वेगळे झालेले दिसेल.

  2. 2

    मग एका चाळणीवर पांढरा सुती कपडा ओला करून ठेवा आणि त्यावर दूध ओता. सगळे पाणी पिळून काढून टाका. गाळलेले पनीर फडक्यात असतानाच गार पाण्याने थोडे धूवून घ्यावे म्हणजे लिंबाची आंबट चव आणि वास निघून जाईलकपड्यावरचे पनीर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात गुलकंद मिक्स करा.

  3. 3

    पॅनमधले दूध आटले कि त्यामध्ये साखर टाकून ढवळा. १/२ कप साखरे ऐवजी १ कप पिठीसाखर टाकली तरीही चालेल. दूधातली साखर विरघळली कि गुलकंद आणि पनीरचे मिश्रण टाकून ढवळा.

  4. 4

    केशर इलायची सिरप आणि वेलची पूड टाकून ढवळा. मिश्रण एकदम कोरडे करू नका. कलाकंद खाताना थोडे ओलसर लागायला हवे. मिश्रण घट्ट होत आले की एका तूप लावलेल्या टिनमध्ये काढा. वरती काजूबदामचे काप टाका आणि दोन तासांसाठी कलाकंद फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा. गार झाल्यावर वड्या पाडून घ्या.

  5. 5

    गार झाल्यावर वड्या पाडून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes