कदलीफलम् उंबर (Kadalifalam Umbar Recipe In Marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#रेसिपीबुक #Week8
#नारळीपौर्णिमारेसिपीज् #पोस्ट१

नारळीपौर्णिमा....म्हणजेच *श्रावणी पौर्णिमा*....तीन उत्सवांचा "त्रिवेणीसंगम"... *उपनयन संस्कार उत्सव, रक्षाबंधन उत्सव आणि समुद्र पूजन उत्सव*

यादिवशी, बहुतांशी ब्राह्मण समाजात *यज्ञोपवीत* बदलले जाते,.. समस्त स्त्री वर्गाकडे आदराने पाहाण्याचा दृष्टिकोन, संरक्षण आणि भाऊ-बहिणीच्या विशुद्ध प्रेमाचा संदेश देणारा उत्सव म्हणजे *रक्षाबंधन* साजरे होते... तसेच जल मार्गाने व्यापार करुन आपला उदरनिर्वाह करणारे व्यापारी बांधव... *सागरे सर्व तीर्थानि* या श्रध्देने, *सागर पूजन* करताना वरुण देवतेला श्रीफळ अर्पण करुन पुन्हा नव्या जोमाने व्यापार सुरु करतात.

नारळीपौर्णिमा.... मनुष्याला विचार, गुण, जीवन व अंतर्गत सौंदर्य आत्मसात करण्याची प्ररेणा देते.... आणि म्हणूनच अशा जीवन सौंदर्याचे प्रतिक असलेले *श्रीफळ*(नारळ... बाहेरुन कठोर पण आतून मऊ) समुद्राला अर्पण होते... बलिदान म्हणून मंदिरात फोडले जाते.... शुभकार्यात वापरले जाते....आणि नैवेद्य-प्रसाद म्हणून विविध पाककृतींमधे सामावले जाते...

अनन्य साधारण महत्व असलेल्या या *श्रीफळाला* (नारळाला) आज मी... एका पारंपरिक रेसिपीत समरस करुन, लुप्तावस्थेच्या मार्गावर असणाऱ्या या रेसिपीला नव्या पध्दतीने सादर केले आहे... 🥰👍🏽😊
(©Supriya Vartak-Mohite)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
२-३ जणांसाठी
  1. 2 वाटीकिसलेला ओला नारळ
  2. 2पिकलेली केळी (तुकडे करुन)
  3. 1/2 वाटीगव्हाचे किंवा तांदळाचे पीठ
  4. 1/4 वाटीचिरलेला गुळ
  5. 1 वाटीमध
  6. 1 वाटीकाजू-बदाम-पिस्ता तुकडे (ऐच्छिक)
  7. तळण्यासाठी शुध्द तुप

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात केळी, गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ, २ चमचे ओला नारळ आणि गुळ एकत्र करुन हाताने मळून मऊसर मिश्रण तयार करावे.

  2. 2

    कढईमधे तुप गरम करुन त्यात तयार केलेल्या मिश्रणाचे गोलाकार उंबर लालसर-तांबूस तळून घ्यावे.

  3. 3

    आता तळलेले उंबर प्रथम मधात डिप करुन मग किसलेल्या ओल्या नारळामधे घोळवावे आणि काजू-बदाम-पिस्ता यांनी गार्निश करुन सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

Similar Recipes