मलिदा (malida recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#GA4
#week15
Keyword - jaggery

गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील jaggery म्हणजेच गुळ या कीवर्ड वरून आजची रेसिपी आहे.
मलिदा लहानपणापासून माझ्या आवडीचा पदार्थ . माझी आई बनवयाची मलिदा पीर बाबा उर्स म्हणजेच जत्रेसाठी. या पदार्थ सोबतच लहानपणी च्या खुप आठवणी आहेत माझ्या☺️ रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि झटपट होते .

मलिदा (malida recipe in marathi)

#GA4
#week15
Keyword - jaggery

गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील jaggery म्हणजेच गुळ या कीवर्ड वरून आजची रेसिपी आहे.
मलिदा लहानपणापासून माझ्या आवडीचा पदार्थ . माझी आई बनवयाची मलिदा पीर बाबा उर्स म्हणजेच जत्रेसाठी. या पदार्थ सोबतच लहानपणी च्या खुप आठवणी आहेत माझ्या☺️ रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि झटपट होते .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपगुळ
  3. मीठ चवीनुसार
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पून तुप
  6. 5-6काजू
  7. 5-6बदाम

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन मीठ आणि पाणी घालून छान मळून घ्या. दहा मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. गुळ बारीक चिरून घ्या.

  2. 2

    पीठाचा एक लहान गोळ घेऊन लाटून त्याला तेल लावून दुमडून घेऊन चपाती लाटून घ्या. तेल लावून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.

  3. 3

    तयार चपात्या ताटात घेऊन थोडे गरम आसतानाच चुरून घ्या. गुळ घाला.

  4. 4

    छान मिक्स करून घ्या. तुप आणि काजू,बदाम घालून मिक्स करा.

  5. 5

    मलिदा आसच खाऊ शकता किंवा आवडत असल्यास दूध घालून खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes